FIFA World Cup: सर्वात मोठी उलटफेर! मेस्सीच्या अर्जेन्टिनाला सौदी अरेबियाकडून पराभवाचा धक्का

या पराभवासह अर्जेंटिनाची सलग 36 सामन्यांची विजयी मालिका खंडित
FIFA World Cup
FIFA World Cupsakal

Argentina vs Saudi Arabia FIFA World Cup 2022 : फुटबॉल विश्वचषकाच्या तिसऱ्या दिवशी सर्वात मोठी उलटफेर झाली आहे. ग्रुप सी मध्ये अर्जेंटिना विरूद्ध सौदी अरेबिया यांच्यात अतिशय चुरशीचा सामना झाला. विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात अर्जेंटिनाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सी गटात सौदी अरेबियाने दोन वेळच्या चॅम्पियन अर्जेंटिनाचा 2-1 असा पराभव केला. 10व्या मिनिटाला कर्णधार मेस्सीने आघाडी घेतल्यानंतरही संघाला सामना जिंकता आला नाही. सौदी अरेबियाकडून सालेह अलसेहरीने 48व्या मिनिटाला आणि सालेम अल्दवसारीने 53व्या मिनिटाला गोल केला. सौदीचा हा विजय मेस्सीच्या अर्जेंटिना संघाला धक्का मानला जात आहे.

FIFA World Cup
FIFA World Cup : फुटबॉल खेळाडूंची टक्कर, नाकाचे हाड मोडले

लिओनेल मेस्सीच्या गोलमुळे अर्जेंटिनाने 1-0 मध्यंतरापर्यंत आघाडी घेतली. मात्र सौदी अरेबियाने उत्तरार्धाच्या सुरुवातीला जबरदस्त आक्रमण केले. त्याने 48व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल केला. त्यानंतर सालेम अलदौसरीने 53 व्या मिनिटाला गोल अर्जेंटिनावर एक गोलची आघाडी घेतती. मग सामना संपेपर्यंत अर्जेंटिनाला या सामन्यात गोल करता आला नाही. त्यामुळे स्पर्धेती पहिल्याच सामन्यात या विश्वचषकाचा दावेदान मानल्या जाणाऱ्या अर्जेंटिनाला धक्का आहे.

FIFA World Cup
FIFA World Cup 2022: FIFA विश्वचषक कार्यक्रमात नोरा दिसेना; चाहते म्हणाले, “शोधू कुठं?”

या पराभवासह अर्जेंटिनाची सलग 36 सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली आहे. यादरम्यान त्याने 25 सामने जिंकले आणि 11 सामने अनिर्णित राहिले होते. अर्जेंटिना आता 27 नोव्हेंबरला मेक्सिको आणि 30 डिसेंबरला पोलंडशी भिडणार आहे. सौदी अरेबियाचा विश्वचषक इतिहासातील हा केवळ तिसरा विजय आहे. अर्जेंटिनाला आता प्री-क्वार्टर फायनलसाठी आपले उर्वरित दोन सामने जिंकावे लागणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com