FIFA World Cup : कतारमध्ये चाललय काय! पत्रकाराला टी-शर्टमुळे केले अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World Cup Qatar 2022

FIFA World Cup : कतारमध्ये चाललय काय! पत्रकाराला टी-शर्टमुळे केले अटक

FIFA World Cup Qatar 2022 : फिफा विश्वचषक यंदा कतारमध्ये खेळल्या जात आहे. 20 नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही स्पर्धा 18 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. जगभरातील फुटबॉल चाहते या विश्वचषकासाठी उत्सुक असून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने कतारला आले आहेत. कतारमध्ये कठोर नियम लागू असतानाही सुरक्षा हा एक प्रमुख मुद्दा आहे. त्यावर सर्वत्र टीकाही होत आहे. दरम्यान, काही पत्रकारांशी गैरवर्तन केल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. तर ग्रँट वाहल या अमेरिकन पत्रकाराला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: FIFA World Cup : फुटबॉल खेळाडूंची टक्कर, नाकाचे हाड मोडले

अमेरिकन पत्रकाराला स्टेडियममध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. अमेरिकन पत्रकाराने सांगितले की सोमवारी त्याला अटक करण्यात आली आहे. कारण तिने इंद्रधनुष्यचा टी-शर्ट घातला होता. कतारमध्ये समलिंगी संबंध बेकायदेशीर आहेत. अमेरिका आणि वेल्स यांच्यातील सामन्यापूर्वी त्याच्यासोबत ही घटना घडली होती. अहमद बिन अली स्टेडियमवर हा सामना झाला. सामना १-१ असा बरोबरीत संपला.

हेही वाचा: FIFA World Cup: सर्वात मोठी उलटफेर! मेस्सीच्या अर्जेन्टिनाला सौदी अरेबियाकडून पराभवाचा धक्का

ग्रँटने सांगितले की, जेव्हा त्यांनी या घटनेबद्दल ट्विट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा मोबाइल फोनही काढून घेण्यात आला. यानंतर त्याला सुमारे अर्धा तास कोठडीत ठेवण्यात आले. यादरम्यान ग्रँटला टी-शर्ट बदलण्यास सांगण्यात आले. असे टी-शर्ट घालण्यास मनाई असल्याचे सांगण्यात आले.