पंधरा वर्षीय शार्दूलचे रुपेरी यश 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

जकार्ता : आशियाई क्रीडा नेमबाजी स्पर्धेतील भारताच्या खूपच लहान नेमबाजांचा पदकवेध कायम राहिला. 15 वर्षांच्या शार्दूल विहान याने डबल ट्रॅप प्रकारात रौप्यपदक जिंकत भारताचे नेमबाजीतील आठवे पदक जिंकले. 

आशियाई स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकलेल्या अन्वर सुलतान यांचा शिष्य असलेल्या शार्दूलने पात्रतेत 150 पैकी 141 गुण मिळवत अव्वल क्रमांक मिळवला. त्यानंतर त्याने गेल्या स्पर्धेतील ब्रॉंझ विजेत्या शिन ह्यूनवू याला चांगलीच लढत दिली, पण अखेर तो सुवर्णपदकाच्या शर्यतीत 73-74 असा पराजित झाला. भारताचे या प्रकारातील प्रमुख आशास्थान असलेला अंकुर मित्तल प्राथमिक फेरीत 134 गुणांसह नववा आला. 

खरं तर शार्दूल चाळीसाव्या शॉटपर्यंत आघाडीवर होता. शार्दूलच्या चुकांमुळे ह्यूनवूने आघाडी घेतली. ब्रॉंझचा निर्णय झाला, त्या वेळी दोघांतील फरक एका गुणावरच आला होता, या वेळी कोणीच चूक केली नाही आणि शार्दूल रौप्यपदकच जिंकू शकला. भारताचे नेमबाजीतील हे चौथे रौप्य तसेच एकंदर आठवे पदक. नेमबाजीच्या पदक क्रमवारीत भारत दुसरा आहे. आघाडीवरील चीनने सहा सुवर्णपदके जिंकली आहेत. दरम्यान, महिलांच्या डबल ट्रॅपमध्ये भारतीय पदकापासून दूरच राहिले. श्रेयासी सिंग 121 गुणांसह सहावी आली, तर वर्षा वर्मन 120 गुणांसह सातवी. 

दृष्टिक्षेपात डबल ट्रॅप 
- एशियाडच्या डबल ट्रॅप प्रकारातील भारताचा तिसरा पदक विजेता 
- रोंजन सोधीचे 2010 च्या स्पर्धेत सुवर्ण, 2006 च्या स्पर्धेत राजवर्धन राठोडचे ब्रॉंझ 
- गतवर्षी राष्ट्रीय स्पर्धेत चार सुवर्णपदके 
- जागतिक कुमार शॉटगन स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक 

Web Title: Fifteen year old Shardul for good Achievement