भारतीयांतील अंतिम लढत जास्त सुखावणारी - सिंधू

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नवी दिल्ली -  राष्ट्रकुल क्रीडा बॅडमिंटनच्या महिला एकेरीतील पराभवानंतरही सिंधू फारशी निराश नव्हती. भारतीय खेळाडूंत अंतिम लढत झाली. पदक वितरणानंतर भारतीय राष्ट्रगीत वाजवण्यात आले हे मोलाचे आहे, असे सिंधूने सागितले.

आमची अंतिम लढत चांगली झाली. त्याचबरोबर आम्ही दोघींनी अंतिम फेरी गाठणेही महत्त्वाचे होते. ही देशासाठी अभिमानास्पद बाब होती. आमच्या दोघींपैकी कोणीतरी एकच जिंकणार होती. आमच्यात यापूर्वीही रंगतदार लढती झाल्या आहेत. त्यांची आणि या सामन्याची तुलना करणे अयोग्य होईल, असे सिंधूने सांगितले. 

रिओ ऑलिंपिक, जागतिक स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा यात सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ‘तीनही अंतिम लढतीत मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचाच प्रयत्न केला. दुसऱ्या गेममध्ये तर काहीही घडू शकले असते, त्यात मी पराजित झाले. विजय आणि पराजय खेळाचाच भाग आहेत. या प्रकारच्या सामन्यानंतर अधिक त्वेषाने खेळ करणे महत्त्वाचे असते, असे सिंधूने सांगितले.

या स्पर्धेत भारताची कामगिरी नक्कीच चांगली झाली. आपण मिश्र सांघिक तसेच महिला एकेरीत प्रथमच विजेते ठरलो. पुरुष तसेच महिला एकेरीत रौप्यपदक जिंकले. दुहेरीतही कामगिरी उंचावली, याकडे सिंधूने लक्ष वेधले. त्याचवेळी तिने आपल्याला स्ट्रोक्‍स सुधारण्याकडे लक्ष द्यावे लागणार असल्याचे सांगितले. या वर्षातील खडतर लढतींसाठी आता पूर्वतयारी करणार असल्याचेही तिने नमूद केले. 

अन्‌ सिंधूची धाव
साईना आणि सिंधूतील अंतिम लढतीनंतर त्या दोघींचे मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांच्यासह छायाचित्र टिपण्यासाठी आग्रह करण्यात आला. साईना, गोपीचंद आणि सिंधू छायाचित्रासाठी सज्जही झाले. अचानक सिंधू स्टॅंडच्या दिशेने धावली आणि ते पाहून गोपीचंद अवाक्‌ झाले; पण काही वेळातच त्यांचा चेहरा अभिमानाने फुलला. सिंधू एका भारतीय पाठीराख्याकडून तिरंगा घेऊन आली होती. राष्ट्रध्वजासह पुन्हा छायाचित्र काढले गेले.

Web Title: final match of the Indians is much better - Sindhu