गांगुलींचे खेळाडूंना दिवाळी गिफ्ट; मिळणार बक्कळ मानधन

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

- प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंना दिवाळी गिफ्ट 
- आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंप्रमाणे कराराची श्रेणी करणार 
- खेळाडूंची विभागणी करुन त्यांना मानधन देणार 

मुंबई : भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंसाठी दिवाळीचे मोठे गिफ्ट दिले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष होताच त्याने प्रामुख्याने या निर्णयात लक्ष घातले. त्याने प्रथम श्रेणी खेळणाऱ्या युवा खेळाडूंसाठी मोठे पाऊल उचलले आहे. 

#DhoniRetires धोनी निवृत्त अन् ट्विटरभर फक्त कॅप्टन कॅप्टन

गांगुलींने लवकरच प्रथम श्रेणीमधील क्रिकेटपटूंसाठीही कराराची पद्धत सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे करारबद्ध करण्यात आलेल्या खेळाडूंना पगार किंवा फी मिळणार आहे. नवी व्यवस्थेनुसार युवा खेळाडूंना वित्तीय सुरक्षा देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 

Image result for bcci

''प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना अनेक समस्या असतात. त्यामुळेच खेळाडूंनी जास्त मानधन मिळावे अशी मागणी केली होती. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना ज्या श्रेणीमध्ये मानधन दिले जाते, त्याच प्रकारची श्रेणी पद्धत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्येही सुरु केली जाणार आहे,'' असे म्हणत त्याने हा निर्णय सांगितला. 

धक्कादायक! लष्करे तय्यबाच्या हिटलिस्टवर टीम इंडियाचा 'हा' प्रमुख खेळाडू

सध्या प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना वर्षाला 25-30 लाख रुपये मानधन मिळते. आता नव्या निर्णयानुसार खेळाडूंची विभागणी केली जाईल आणि मग त्यांना श्रेणीनुसार मानधन दिले जाईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर बीसीसीआयच्या वतीने A+, A, B, आणि C अशा श्रेणी आहेत. या श्रेणींनुसार खेळाडूंना अनुक्रमे 7 कोटी, 5 कोटी, 3 कोटी आणि 1 कोटी रुपये मानधन दिले जाते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First Class Cricketers Of India To Have Contract System