आजपासून पुण्यात पहिली कसोटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

थेट प्रक्षेपण सकाळी ९ पासून
पुणे भारतातील ठरणार २५वे कसोटी केंद्र

थेट प्रक्षेपण सकाळी ९ पासून
पुणे भारतातील ठरणार २५वे कसोटी केंद्र

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेस उद्या गुरुवारी पुणे येथील गहुंजेच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर पहिला कसोटी सामन्याने सुरवात होईल. त्या वेळी पुणे कसोटी केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करेल. पुणे हे देशातील २५वे आणि जगातील ११२वे कसोटी केंद्र ठरेल. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे स्टेडियम असेच या मैदानाचे नाव आहे. मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या गहुंजे गावात एप्रिल २०१२ मध्ये हे स्टेडियम उभे राहिले. मैदानाची क्षमता ३७ हजार इतकी आहे. आयपीएल, वन-डे क्रिकेट आणि टी-२० क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने येथे झाले असले तरी, कसोटी सामना या मैदानावर प्रथमच खेळवला जात आहे.  प्रा. दि. ब. देवधर, सदू शिंदे, बाळ दाणी, चंदू बोर्डे, वसंत रांजणे, हेमंत कानिटकर, हृषीकेश कानिटकर, इक्‍बाल सिद्दिकी अशा खेळाडूंच्या समावेशाने पुणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केव्हाच पोचले असले तरी, कसोटी सामन्याचे केंद्र म्हणून पुण्याचे उद्या पदार्पण होईल.
 

संकलन - गंगाराम सपकाळ

Web Title: The first test today in Pune