क्रिकेट भ्रष्टाचाराबद्दल पाच वर्षे कैद

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज गुलाम बोडी याला क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची कबुली दिल्याबद्दल पाच वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. दोन एकदिवसीय आणि एक ट्‌वेंटी-20 खेळलेल्या बोडीने क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचे आठ आरोप मान्य केले.

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज गुलाम बोडी याला क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची कबुली दिल्याबद्दल पाच वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. दोन एकदिवसीय आणि एक ट्‌वेंटी-20 खेळलेल्या बोडीने क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचे आठ आरोप मान्य केले.

हॅन्सी क्रोनिए प्रकरणानंतर दक्षिण आफ्रिकेत भ्रष्टाचार रोखण्यासाठी कायदा करण्यात आला होता. त्यानुसार ही शिक्षा झाली आहे. त्यात खेळासंदर्भातील भ्रष्टाचाराचे कलम जोडण्यात आले होते. त्यात सर्वाधिक शिक्षा पंधरा वर्षांची आहे. बोडीला पाच वर्षांची शिक्षा करण्यात आली.

दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक स्पर्धेतील लढतींचे निकाल निश्‍चित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बोडीवर यापूर्वीच क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने वीस वर्षांची बंदी घातली आहे. हे प्रकरण चार वर्षांपूर्वीचे आहे. तो गतवर्षीच्या जुलैत पोलिसांना शरण आला आणि त्याने नोव्हेंबरमध्ये आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात अन्य खेळाडूंवर दोन ते बारा वर्षांची बंदी घातली होती. त्यातील अल्वीरो पीटरसन हा आंतरराष्ट्रीय समालोचकही झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five years jail for cricket fixing