मेस्सीला सातव्यांदा Ballon d'or पुरस्कार; रोनाल्डोला टाकलं मागे

मेस्सीला सातव्यांदा Ballon d'or पुरस्कार; रोनाल्डोला टाकलं मागे
Summary

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने सातव्यांदा बॅलड डीओर पुरस्कार जिंकला आहे.

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने सातव्यांदा बॅलड डीओर पुरस्कार जिंकला आहे. यंदाही पुरस्कार जिंकत त्यानं रोनाल्डो आणि लेवानडॉस्की यांना मागे टाकलं आहे. ३४ वर्षीय मेस्सीने अंतिम फेरीत पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि रॉबर्ड लेवानडॉस्की यांना मागे टाकत पुरस्कार पटकावला. त्यानं याआधी २००९ ते २०१२ अशी सलग चार वर्षे आणि २०१५, २०१९ मध्ये या पुरस्कारावर नाव कोरलं होतं.

मेस्सीनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो हा सर्वाधिक वेळा बॅलन डीओर पुरस्कार मिळवणारा फुटबॉलपटू आहे. रोनाल़्डोने २००८, २०१३, २०१४, २०१६, २०१७ मध्ये बॅलन डीओर पुरस्कार पटकावला होता. त्याच्याशिवाय जोहान क्राएफस मायकल प्लाटिनी, मार्को वान बास्टन यांनी प्रत्येकी ३ वेळा या पुरस्कारावर याआधी नाव कोरलं आहे. तर फ्रेंच बेकेनबाऊर, रोनाल्डो नाजारियो, अल्फ्रेडो डी स्टेफनो, केविन कीगन, कार्ल हेन्ज यांनी प्रत्येकी दोन वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

फ्रान्समधील फुटबॉल मासिक बॅलन डीओरकडून हा पुरस्कार दिला जातो. क्लब आणि राष्ट्रीय संघात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला या पुरस्काराने दरवर्षी गौरवण्यात येतं. १९५६ पासून देण्यात येणारा हा पुरस्कार पहिल्यांदा स्टॅनले मॅथ्यूज यांना देण्यात आला होता. पुरुषांना १९५६ पासून तर महिला फुटबॉलरना हा पुरस्कार देण्याची सुरुवात २०१८ पासून झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com