फुटबॉल सामन्याचा निकाल 3-0 नव्हे 2.6-0

महिला फुटबॉल लढतीत गोलाचे मूल्यच कमी करण्यात आले
महिला फुटबॉल लढतीत गोलाचे मूल्यच कमी करण्यात आले

साओ पावलो : समान मानधन मिळत नसल्याच्या निषेधार्थ ब्राझीलमधील महिला फुटबॉलपटूंनी वेगळीच क्‍लृप्ती अमलात आणली. साओ पावलो राज्य स्पर्धेतील अंतिम सामन्याचा निकाल 3-0 लागला होता; पण महिला फुटबॉलपटूंना सापत्न वागणूक दिली जाते, हे दाखवण्यासाठी तोच निकाल 2.6-0 असा दाखवण्यात आला.

साओ पावलोतील एरिना कॉरिथियान्स येथे विक्रमी 28 हजार चाहत्यांनी गर्दी केली होती. कॉरिथियान्सच्या व्हिक अल्बुक्वेर्क हिने गोल केल्यावर सामन्यातील अधिकृत गोलफलक 1-0 ऐवजी 0.8-0 असा झळकला. ब्राझीलमध्ये नुकताच पुरुष आणि महिला फुटबॉलपटूंचे मानधन दाखवणारी आकडेवारी प्रसारित झाली. त्यानुसार महिला फुटबॉलपटूंना पुरुष खेळाडूंच्या वीस टक्के कमी मानधन मिळते. त्यामुळे त्यांनी केलेल्या गोलची किंमतही वीस टक्‍क्‍यांनी कमी असल्याचेच गोलफलक दर्शवत होता.

पॉलिस्ता फुटबॉल महासंघ आणि संयुक्त राष्ट्र महिला यांनी संयुक्तपणे महिला फुटबॉलपटूंना मिळणाऱ्या कमी मानधनाकडे जगाचे लक्ष वेधण्याचे ठरवले आहे. कॉरिथियान्सने या सामन्यात तीन गोल केले; पण निकाल 2.6-0 असा दाखवला गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com