Sat, June 3, 2023

खोट्या बातम्यानंतर फुटबॉल सुपर-एजंट मिनो रायओला यांचे निधन
Published on : 1 May 2022, 3:38 am
झ्लाटन इब्राहिमोविक, पॉल पोग्बा आणि एर्लिंग हॅलँड यासारख्या अव्वल खेळाडूंचे प्रतिनिधित्व करणारे फुटबॉल सुपर-एजंट मिनो रायओला यांचे शनिवारी वयाच्या 54 व्या वर्षी इटालियन रुग्णालयात आजारपणाशी झुंज देत असताना त्याचे निधन झाले. असे त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी सोशल मीडियावर हे माहिती दिली. त्याआधी त्यांच्या मृत्यूची बातमी व्हायरल झाली होती. गुरुवारी रात्री फुटबॉल जगतातील सुपर एजंट रायओला यांचे निधन झाल्याची बातमी आली होते. परंतु एजंट यांनी ट्विट करून सांगतिले मी जिवंत आहे. चार महिन्यांत त्यांनी मला दुसऱ्यांदा मारले आहे. (Football Super Agent Mino Raiola Passes Away)