विश्‍वकरंडक फुटबॉलसाठी संघ जाहीर होण्यास सुरवात

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

पेरू कर्णधार गुएर्रेरो मुकणार 
या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पेरूचा कर्णधार पाओलो गुएर्रेरो याला मुकावे लागणार आहे. उत्तेजक सेवन प्रकरणात त्याच्यावरील निलंबनाची कारवाई वाढवण्यात आल्याने त्याला या स्पर्धेत खेळता येणार नाही. त्याच्यावर आधी सहा महिन्यांची बंदी होती. मात्र, ती संपत असतानाच त्याच्यावरील बंदी 14 महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली. गेल्या वर्षी विश्‍वकरंडक पात्रता फेरीत अर्जेंटिनाविरुद्धच्या लढतीदरम्यान घेण्यात आलेल्या चाचणीत तो दोषी आढळला होता. 

ब्युनोस आयर्स (अर्जेंटिना) - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा तोंडावर आली असतानाच पात्र देशांनी आपले संघ जाहीर करण्यास सुरवात केली आहे. या संघांवर एक नजर टाकली असता अनुभवी आणि प्रमुख खेळाडूंना स्थान देण्याकडे कल राहिलेला दिसून येतो. अर्जेंटिना संघात प्रशिक्षक साम्पोली यांनी मेस्सी, अग्युएरो, डी मारिया यांच्यासह मौरो इकार्डी आणि पावलो डीबाला या इटालियन मोसम गाजवणाऱ्यांना स्थान दिले आहे. 

दुसरीकडे जर्मनीने संघातील खेळाडूंची संख्या वाढवताना जखमी गोलरक्षक मॅन्युएल न्युएर याला संधी दिली आहे. मात्र, 2014च्या विजेत्या संघातील मारिओ गोएत्झचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. 

मेक्‍सिकोने असाच निर्णय घेताना अमेरिकेत ड्रग्ज वाहतुकीचा आरोप असलेल्या रॅफेल मार्क्वेझ या प्रमुख खेळाडूला संधी दिली आहे. तो पाचव्यांदा विश्‍वकरंडक खेळेल. प्रशिक्षक ओसोरियो यांनी युरोपमध्ये खेळलेल्या 12 खेळाडूंना संधी दिली आहे. 

ऑस्ट्रेलियाने मात्र युवा खेळाडूंवर विश्‍वास दाखवला आहे. त्यानी जेमी मॅक्‍लेरन, गोलरक्षक मिश लॅंगरक यांना वगळले आहे. त्यातही जुन्या नव्याचा समतोल साधताना टीम काहिल आणि मार्क मिलिगन यांना पुन्हा संधी दिली आहे. पनामा संघाचे प्रशिक्षक हेर्नमन दारिओ गोमेझ यांनी 35 जणांचा संभाव्य संघ निवडताना अनुभव आणि युवा खेळाडूंना समान संधी दिली आहे. 

ब्राझील संघानेही दुखापतीतून बरे होत असलेल्या नेमारला संधी दिली आहे. त्याचवेळी मार्सलो आमचा आधारस्तंभ असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. 

पेरू कर्णधार गुएर्रेरो मुकणार 
या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पेरूचा कर्णधार पाओलो गुएर्रेरो याला मुकावे लागणार आहे. उत्तेजक सेवन प्रकरणात त्याच्यावरील निलंबनाची कारवाई वाढवण्यात आल्याने त्याला या स्पर्धेत खेळता येणार नाही. त्याच्यावर आधी सहा महिन्यांची बंदी होती. मात्र, ती संपत असतानाच त्याच्यावरील बंदी 14 महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली. गेल्या वर्षी विश्‍वकरंडक पात्रता फेरीत अर्जेंटिनाविरुद्धच्या लढतीदरम्यान घेण्यात आलेल्या चाचणीत तो दोषी आढळला होता. 

Web Title: football World Cup