स्पर्धेतील अंतिम सामना कोलकत्याला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

कोलकता - या वर्षी भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेची अंतिम लढत २८ ऑक्‍टोबर रोजी कोलकता येथे होणार असून, स्पर्धेतील उपांत्य लढीत मुंबई आणि गुवाहाटी येथे खेळविण्यात येतील. स्पर्धा ६ ते २८ ऑक्‍टोबरदरम्यान होणार आहे.  

‘फिफा’च्या स्पर्धा प्रमुख जेमी यार्झा यांच्या नेतृत्वाखाली ‘फिफा’च्या पथकाने सात दिवस केलेल्या पाहणीनंतर स्पर्धा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला. या पथकाने कोलकता, नवी दिल्ली, गुवाहाटी, मडगाव, कोची आणि नवी मुंबई येथील स्पर्धा केंद्रांची पाहणी केली. सर्वांत शेवटी त्यांनी कोलकता केंद्राची पाहणी केली होती.

‘फिफा’च्या समितीने मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमला सर्वोत्तम म्हणून पसंती दिली होती. त्यामुळे अतिम सामना तेथेच खेळविला जाईल, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत होती. याबाबत विचारले असता ‘फिफा’ संयोजन समितीचे प्रमुख यार्झा म्हणाले, ‘‘डी. वाय. पाटील स्टेडियम सर्वोत्तमच होती; पण आज येथील कोलकता स्टेडियमची पाहणी केल्यानंतर आमचे मत परिवर्तन झाले. या स्टेडियमच्या प्रगतीचा झपाटा खूप आहे. त्यांनी आमच्या प्रत्येक सूचनेनुसार स्टेडियममध्ये बदल केले आहेत. काम अर्धवट असले, तरी ते योग्य वेळेत पूर्ण केले जाईल, अशी खात्री कोलकता सरकारने दिली आहे.’’ 

असे होतील सामने
  कोलकता - ‘एफ’ गटातील साखळी सामन्यांसह उपउपांत्य आणि उपांत्यपूर्व फेरीची एक लढत, तसेच स्पर्धेचा अंतिम सामना 
  नवी मुंबई - ‘अ’ गटातील साखळी सामन्यांसह उपउपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीची लढत
  गुवाहाटी - ‘ई’ गटातील साखळी लढतींसह उपउपांत्य आणि उपांत्यपूर्व फेरीची प्रत्येकी एक लढत
  गोवा - ‘क’ गटातील साखळी लढतींसह उपउपांत्यपूर्व फेरीतील दोन आणि उपांत्यपूर्व फेरीची एक लढत 
  कोची - ‘ड’ गटातील साखळी सामन्यांसह उपउपांत्य आणि उपांत्यपूर्व फेरीतील प्रत्येकी एक लढत
  नवी दिल्ली - ‘ब’ गटातील साखळी लढतींसह उपउपांत्यपूर्व फेरीच्या दोन लढती

Web Title: The football World Cup under 17 years