धक्कादायक! मायकेल क्लार्क कर्करोगाने ग्रस्त; उपचार सुरू

वृत्तसंस्था
Monday, 9 September 2019

- कॅन्सरमुळे माझ्या चेहऱ्यावर अजून एक खूण झाली आहे.

क्रिकेट विश्वात आपला दबदबा कायम राखलेला ऑस्ट्रेलिया संघ बऱ्याच क्रिकेट प्रेमींचा फेव्हरिट आहे. हा संघ आपल्या खेळासाठी तर ओळखला जातोच, पण त्याचबरोबर या संघातील खेळाडूंचेही जगभरात लाखो चाहते आहेत.

- अमेरिकन ओपन : नदालने पटकाविले 19 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद

अॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग आणि मायकेल क्लार्क यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने पाच विश्वकरंडक आपल्या नावे केले आहेत. या कर्णधारांपैकी एकजण सध्या कॅन्सरशी लढा देतोय. 2015 साली ऑस्ट्रेलियाला विश्वकरंडक जिंकून देणारा माजी कर्णधार मायकेल क्लार्क सध्या त्वचेच्या कॅन्सरने ग्रस्त आहे. 

- Ashes 2019 : ऑस्ट्रेलियाने 'ऍशेस' कायम राखल्या!

2015 चा विश्वकरंडक जिंकल्यावर क्लार्कने क्रिकेटमधून संन्यास घेतला. त्यानंतर काही दिवस तो क्रिकेट कॉमेंट्री करतानाही दिसून आला. मात्र, काल त्याने इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट अपलोड केली आहे. यामध्ये तो कॅन्सरशी लढा देत असल्याचे सांगत क्रिकेटप्रेमींना धक्का दिला.

Image may contain: 4 people, people smiling, people standing

या पोस्टमध्ये त्याने लिहले आहे की, कॅन्सरमुळे माझ्या चेहऱ्यावर अजून एक खूण झाली आहे. मी सर्व तरुण-तरुणींना विनंती करतो की, त्यांनी सूर्याच्या किरणांपासून वाचण्यासाठी उपयुक्त पावले उचलावीत.

Image may contain: 6 people, outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Australian captain Michael Clarke shares photo of skin cancer