सट्टेबाजीत आजिवन बंदी असलेल्या मय्यप्पनची पत्नी क्रिकेट अध्यक्षा

Former BCCI chief Srinivasans daughter Rupa Gurunath elected as TNCA president
Former BCCI chief Srinivasans daughter Rupa Gurunath elected as TNCA president

चेन्नई :  बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची कन्या आणि आयपीएल सट्टेबाजीत दोषी ठरलेले गुरुनाथ मय्यपन यांची पत्नी रुपा गुरुनाथ यांची तमिळनाडू क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. 

तमिळनाडू क्रिकेटमध्ये भ्रष्टाचाराला थारा नसेल, असा विश्‍वास रुपा गुरुनाथ यांनी बिनविरोध निवड होताच व्यक्त केला. 

2013 मधील आयपीएलमध्ये स्पॉट फिक्‍सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणात रुपा यांचे पती गुरुनाथ मय्यपन यांना क्रिकेटमधून आजिवन बंदी घालण्यात आली आहे. 

तमिळनाडू क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी रुपा मय्यपन यांचा अपवाद वगळता इतर कोणीही अर्ज केला नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

चेन्नई चिपॉक स्टेडियममधील बंद असलेल्या तीन स्टॅंडसंदर्भात सरकारशी सल्लामसलत करून हे स्टॅंड प्रेक्षकांसाठी सुरू करणे हे आपले पहिले काम असेल, असे रुपा यांनी सांगितले. त्याचबरोबर तमिळनाडू क्रिकेटमध्ये भ्रष्टाचाराला स्थान नसेल आणि कोणी तसा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करणे हे आपले कर्तव्य असेल, असेही त्या म्हणाल्या. 

तमिळनाडू क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेल्या आपण पहिल्या महिला असल्याचा आनंद आहे. ही संघटना व्यावसायिक दृष्टिकोनातून चालवली जात आहे. खेळाडूंच्या हिताला प्राधान्य दिले जात असते. 

वादातील तमिळनाडू क्रिकेट लीग 
नुकतीच पार पडलेली तमिळनाडू क्रिकेट लीग मॅच फिक्‍सिंगच्या आरोपांमुळे चर्चेत राहिली आहे. संघमालकांनीच प्रतिस्पर्धी संघातील काही खेळाडूंना फिक्‍सिंग करण्याची ऑफर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे, त्यातच माजी क्रिकेटपटू आणि लीगमधील एका संघाचे मालक असलेल्या व्हीबी चंद्रशेखर यांनी आत्महत्या केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com