माजी विजेत्या वॉव्रींकाचे पुनरागमन अपयशी गुलेर्मोविरुद्ध हार

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 मे 2018

माजी विजेत्या स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉव्रींकाचे फ्रेंच ओपनमधील पुनरागमन फसले आहे. त्याला पहिल्याच फेरीत स्पेनच्या गुलेर्मो गाल्सिया-लोपेझ याने त्याला पाच सेटमध्ये 6-2, 3-6, 4-6, 7-6 (7-5), 6-3 असे वॉव्रींकाने 2015 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. गेल्या मोसमात त्याच्या गुडघ्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यानंतर तो पुनरागमन करीत आहे. त्याला 23वे मानांकन होते. पहिला सेट गमावल्यानंतर त्याने पुढील दोन सेट जिंकले होते. त्यानंतर मात्र तो हरला. 
 

पॅरिस - माजी विजेत्या स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉव्रींकाचे फ्रेंच ओपनमधील पुनरागमन फसले आहे. त्याला पहिल्याच फेरीत स्पेनच्या गुलेर्मो गाल्सिया-लोपेझ याने त्याला पाच सेटमध्ये 6-2, 3-6, 4-6, 7-6 (7-5), 6-3 असे वॉव्रींकाने 2015 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. गेल्या मोसमात त्याच्या गुडघ्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यानंतर तो पुनरागमन करीत आहे. त्याला 23वे मानांकन होते. पहिला सेट गमावल्यानंतर त्याने पुढील दोन सेट जिंकले होते. त्यानंतर मात्र तो हरला. 

अझारेन्का पराभूत 
खासगी आयुष्यातील समस्यांमुळे त्रस्त झालेल्या बेलारूसच्या व्हिक्‍टोरिया अझारेन्काच्या आशा संपुष्टात आल्या. चेक प्रजासत्ताकाच्या कॅटरीना सिनियाकोवाने तिला 7-5, 7-5 असे हरविले. मुलाच्या ताब्यावरून खटला लढवित असलेल्या व्हिक्‍टोरियाची मोसमातील ही पाचवीच स्पर्धा आहे. माद्रिदमध्ये ती दुसऱ्या, तर रोममध्ये पहिल्याच फेरीत हरली होती. अव्वल स्थानावरून तिची 84व्या क्रमांकापर्यंत घसरण झाली आहे. 

पेट्रा क्विटोवा आणि नाओमी ओसाका यांनी आगेकूच केली. आठव्या मानांकित क्विटोवाने व्हेरोनिका सेपेडे रॉयगचे आव्हान 3-6, 6-1, 7-5 असे परतावून लावले. माद्रिदमधील विजेतेपदामुळे पेट्राची संभाव्य विजेत्यांमध्ये गणना होत आहे. निर्णायक सेटच्या 11व्या गेममध्ये तिने ब्रेक मिळविला. 
जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकेच्या सोफिया केनीनला 6-2, 7-5 असे हरविले. इंडियन वेल्समधील विजेतेपदासह ओसाकाने अपेक्षा उंचावल्या आहेत. 

"मीडिया'वर खापर 
22वे मानांकन असलेल्या ब्रिटनच्या योहाना कॉंटाला सलामीलाच कझाकिस्तानच्या युलिया पुतीनत्सेवाने 6-4, 6-3 असे हरविले. योहाना सलग चौथ्या वेळी रोलॉं गॅरोवर पहिल्याच फेरीत हरली. आधीच्या तीन वर्षांतील तिच्या खराब कामगिरीचा उल्लेख करून प्रसार माध्यमांनी फारशा आशा नसल्याचा उल्लेख केला होता. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून योहानाने अशा गोष्टींमुळे फारसा फायदा होत नसल्याचे स्पष्ट केले. युलिया 93व्या स्थानावर असल्यामुळे योहानाचा पराभव निराशाजनक ठरला. 

Web Title: Former champ Wawrinka out of French Open