Freddy Rincon Accident | कोलंबियाचा फुटबॉलपटू फ्रेडी रिंकनचा अपघातात मृत्यू

डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला
Freddy Rincon Accident Colombian footballer dies after traffic accident
Freddy Rincon Accident Colombian footballer dies after traffic accident sakal

कोलंबियाचा दिग्गज फुटबॉलपटू आणि माजी कर्णधार फ्रेडी रिंकन यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. सोमवारी कार अपघातात जखमी झाल्यानंतर रिंकन जीवन आणि मृत्यू यांच्यात झुंज देत होता. मात्र गुरुवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Freddy Rincon Accident)

कोलंबियातील कॅली येथे सोमवारी त्यांची कार बसला धडकली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तीन दिवसांनंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे वय 55 वर्षे होते. रिअल माद्रिदकडून खेळणाऱ्या या मिडफिल्डरने कोलंबियासाठी १७ गोल केले आणि तीन विश्वचषकांमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.(Freddy Rincon Accident dies)

फ्रेडी रिंकन 1990, 1994 आणि 1998 च्या विश्वचषक कोलंबिया देशासाठी खेळला आहे. विश्वचषक स्पर्धेत देशासाठी सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम संयुक्तपणे त्याच्या नावावर आहे. त्याने विश्वचषक स्पर्धेत कोलंबियाकडून 10 सामने खेळले आहेत. 1990 मध्ये कोलंबियाचा संघ तब्बल 28 वर्षांनी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. रिंकन हा त्यावेळी संघाचा भाग होता आणि जर्मनीविरुद्धच्या सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात रिंकनने संस्मरणीय गोल केला होता. क्लब फुटबॉलमध्ये रिंकन नेपोली, पाल्मीरास आणि सॅंटोसचा भाग होता. त्याच वेळी 2000 साली झालेल्या पहिल्या क्लब विश्वचषकातही त्याने कोरिंथियन्सला विजय मिळवून दिला होता. तेव्हा ही स्पर्धा फिफा क्लब वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणून ओळखली जात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com