French Open 2023 : एलिना रायबाकिना तिसऱ्या फेरीत; जोकोविच, अल्काराझ यांचेही विजय

फ्रेंच ओपन ; रायबाकिनाने यंदाच्या वर्षात ऑस्ट्रेलियन ओपनचीही अंतिम फेरी गाठली
french open roland garros 2023 elena rybakina title favourite straight sets third round noskova
french open roland garros 2023 elena rybakina title favourite straight sets third round noskovasakal

पॅरिस : चौथ्या मानांकित एलिना रायबाकिना हिने चेक प्रजासत्ताकच्या १८ वर्षांच्या लिंडा नोस्कोवाचा ६-३, ६-३ असा पराभव करून फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत तिसरी फेरी गाठली. रायबाकिनाकडे यंदाच्या स्पर्धेत संभाव्य विजेती म्हणून पाहिले जात आहे.

रायबाकिनाने यंदाच्या वर्षात ऑस्ट्रेलियन ओपनचीही अंतिम फेरी गाठली होती. दुसऱ्या फेरीतील या विजयासाठी तिला फारसे सायास पडले नाहीत. नोस्कोवा जागतिक क्रमवारीत ५० व्या स्थानावर आहे. दुसऱ्या गेमध्ये तिचा एक फटका नेटमध्ये गेला आणि रायबाकिनाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

नोस्कोवा १८ वर्षांची असली तरी ती पॅरिसच्या या क्ले कोर्टवर नवखी नव्हती, दोन वर्षांपूर्वी तिने याच कोर्टवर ज्युनियर गटाचे विजेतेपद मिळवले होते. रायबाकिनाविरुद्ध पिछाडीवर जात असली तरी ती हार मानायला तयार नव्हती; परंतु काही धोकादायक फटक्यांनी तिचा घात केला.

४०-४० अशा बरोबरीत असताना डबल फॉल्ट करून तिने पायावर धोंडा मारला. त्यामुळे ती ३-५ अशी मागे पडली. रायबाकिनाने यंदाच्या मोसमात रोम आणि इंडियाना वेल्स स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे.

french open roland garros 2023 elena rybakina title favourite straight sets third round noskova
Team India : IPL 2023 संपली अन् टीम इंडियाच्या 'या' 3 खेळाडूंची कारकीर्दही मावळली

जोकोविच तिसऱ्या फेरीत

वादग्रस्त कृतीमुळे अडचणीत सापडणाऱ्या नोवाक जोकोविचने तिसऱ्या फेरीत स्थान मिळवताना मार्टोन फुक्सोविसचा ७-६(२), ६-०, ६-३ असा पराभव केला. चित्रिकरण करत असलेल्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर सर्बिया संदर्भात संदेश लिहिल्यामुळे जोकोविच अडचणीत आला आहे.

फुस्कोविसविरुद्ध तीन सेटमध्ये त्याने विजय मिळवला असला तरी पहिल्या गेमध्ये त्याला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तुमची उपस्थिती आणि तुमचा पाठिंबा यामुळे मी खडतर प्रयत्न करावे लागलेल्या पहिल्या सेटमध्ये विजय मिळवू शकलो, अशी भावना जोकोविचने विजयानंतर व्यक्त केली.

french open roland garros 2023 elena rybakina title favourite straight sets third round noskova
French Open 2023: डॅनिल मेदवेदेवला पराभवाचा धक्का! पात्रता फेरीमधून आलेल्या थियागो वाईल्डचा सनसनाटी विजय

जोकोविचप्रमाणे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात असलेल्या स्पेनच्या कार्लोस अल्काराझने दुसऱ्या फेरीत जपानच्या तारो दानिलचे आव्हान ६-१, ३-६, ६-१, ६-२ असे मोडित काढले; परंतु या विजयासाठी त्याला चार सेट लढावे लागले. जोरदार हवा सुरू असल्यामुळे अल्काराझला फटक्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण जात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com