पुनरागमनानंतरच योगेश्‍वरचा निर्णय 

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

दुखापतींपासून पूर्ण मुक्त असेन, त्या वेळीच स्पर्धेत खेळता येईल आणि त्या वेळीच नेमकी क्षमता कळू शकेल. आता स्पर्धेत पुनरागमन कधी करणार? हेही सांगणे अवघड आहे; तसेच आशियाई, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळू शकेन का? हेही सांगणे अवघड आहे,' असे त्याने सांगितले. 

नवी दिल्ली - दुखापतीच्या प्रतिकूल डावांना सतत सामोरे जात असलेल्या योगेश्वर दत्तने स्पर्धात्मक कुस्तीचा निरोप घेण्याचा सध्या, तरी कोणताही विचार नसल्याचे सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील चमकदार कामगिरीनंतरच निरोप घेणार असल्याचे त्याने सांगितले. रिओ ऑलिंपिकनंतर निवृत्त होणार असल्याचे योगेश्वरने काही महिन्यांपूर्वी सांगितले होते; मात्र त्या स्पर्धेत तो अपयशी ठरला. आठ महिने त्याला दुखापतीने सतावले. "वर्षभर दुखापतींनीच त्रस्त आहे. पूर्ण तंदुरुस्तीचेच लक्ष्य साध्य करण्याचा सध्या प्रयत्न आहे.

दुखापतींपासून पूर्ण मुक्त असेन, त्या वेळीच स्पर्धेत खेळता येईल आणि त्या वेळीच नेमकी क्षमता कळू शकेल. आता स्पर्धेत पुनरागमन कधी करणार? हेही सांगणे अवघड आहे; तसेच आशियाई, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळू शकेन का? हेही सांगणे अवघड आहे,' असे त्याने सांगितले. 

Web Title: Future uncertain but Yogeshwar Dutt not ready to give up