गौतम गंभीर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त

वृत्तसंस्था
बुधवार, 5 डिसेंबर 2018

भारताचा सलामीचा फलंदाज गौतम गंभीर याने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचा निर्णय जाहीर केला. गंभीरने यासाठी थेट संवाद न साधता सोशल मिडीयाचा आधार घेतला. 

नवी दिल्ली : भारताचा सलामीचा फलंदाज गौतम गंभीर याने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचा निर्णय जाहीर केला. गंभीरने यासाठी थेट संवाद न साधता सोशल मिडीयाचा आधार घेतला. 

फेसबुक आणि ट्विटरवरून व्हिडिओद्वारे हा निर्णय जाहीर केला. "आयुष्यातील हा सर्वांत कठिण निर्णय असून, हृदय कठोर करूनच आपण क्रिकेट कारकिर्द थांबविण्याचा निर्णय घेतला.' असे गंभीरने म्हटले आहे. 

गंभीरच्या निर्णयामुळे आता रणजी करंडक स्पर्धेत गुरुवारपासून (ता.6) आंध्रविरुद्ध होणारा दिल्लीचा रणजी सामना गंभीरच्या कारकिर्दीमधील अखेरचा सामना असेल. पुढील वर्षी आयपीएलमध्ये देखील गंभीर खेळणार नाही. 

गंभीरने भारताकडून 58 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी 20 सामने खेळले आहेत. पंधरावर्षाच्या कारकिर्दीत गंभीरने कसोटी 4,154 धावा करताना 9 शतके, 22 अर्धशतके झळकाविली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 11 शतके, 34 अर्धशतकांसह 5,238 धावा केल्या असून, टी 20 क्रिकेटमध्ये सात अर्धशतकांसह त्याच्या 932 धावा आहेत. 

Web Title: gautam gambhir announces retirement