
IND vs AUS : "रिटायर खेळाडूना फक्त मसाला पाहिजे" वेंकटेश प्रसादवर गौतम गंभीर घसरला
Gautam Gambhir to Venkatesh Prasad : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने केएल राहुलवर टीका करणाऱ्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन कसोटींमधून राहुलला वगळण्यात आले होते, त्यानंतर उपकर्णधारपदही काढून घेण्यात आले होते. कसोटी मालिकेतील फ्लॉप शोनंतर व्यंकटेश प्रसादसह अनेकांनी राहुलची कसोटी संघातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.
मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात राहुलने अर्धशतक झळकावून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. आता लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीरनेही व्यंकटेश प्रसादचे नाव न घेता आपल्या संघाचा कर्णधार केएल राहुलचा बचाव केला आहे. गंभीरने म्हटला की, अनेक माजी क्रिकेटपटू प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी हे सर्व करतात.
स्पोर्ट च्या एका चैनलशी संवाद साधताना गंभीर म्हणाला, कसले दडपण? मागच्या वेळी लखनौ सुपर जायंट्स तिसऱ्या क्रमांकावर आलो. आरआर आणि एलएसजी यांच्यात चुरशीची लढत झाली होती. साहजिकच एकच संघ ट्रॉफी उचलू शकतो आणि गुजरातने आयपीएल जिंकले, ते गेल्या हंगामात उत्तम क्रिकेट खेळले होते जर तुम्ही लखनौची त्यांच्या पदार्पणाच्या हंगामातील कामगिरी पाहिली तर ते RR मुळे तिसरे स्थान मिळवले. जर तुम्ही आयपीएलमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिलात तर तुम्हाला प्लेऑफमध्ये दोन संधी मिळतील.
गंभीर पुढे बोलताणा म्हणाला, राहुलने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे, टूर्नामेंटमध्ये त्याच्याकडे 4-5 शतके आहेत. तुम्ही त्या खेळाडूबद्दल बोलत आहात ज्याने आतापर्यंत 4-5 शतके झळकावली आहेत. गेल्या मोसमातही त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावले होते.
कधीकधी माजी क्रिकेटपटूंना सक्रिय राहण्यासाठी काही मसाला हवा असतो. म्हणूनच तुम्ही लोकांवर टीका करता. माझ्या मते केएल ज्या प्रकारचा खेळाडू आहे, तो कोणत्याही प्रकारच्या दडपणाखाली असणार नाही. तुम्ही एका खेळाडूसह स्पर्धा जिंकू शकत नाही. ड्रेसिंग रूममधील 25 खेळाडू तुम्हाला स्पर्धा जिंकण्यात मदत करतात.