धोनीमुळेच विश्वकरंडकात माझे शतक हुकले; गंभीर बरळला

वृत्तसंस्था
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

धोनीने माझे शतक जवळ आले आहे अशी आठवण करुन दिली आणि म्हणूनच माझे शतक हुकले असे बेताल वक्तव्य गंभीरने केले आहे. 

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि नवी दिल्लीचा खासदार गौतम गंभीर त्याच्या बेताल वक्त्यव्यांमुळे प्रसिद्ध आहे. आताही त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर निशाणा साधला आहे. 2011 मद्ये झालेल्या विश्वकरंडकाच्या अतिंम सामन्यात गंभीरचे शतक तीन धावांनी हुकले होते. त्याचे खापर आता गंभीरने आठ वर्षांनंतर धोनीवर फोडले आहे. 

धक्कादायक! सावंतवाडीच्या फलंदाजाचा अर्धशतक ठोकल्यानंतर झाला मृत्यू

धोनीने माझे शतक जवळ आले आहे अशी आठवण करुन दिली आणि म्हणूनच माझे शतक हुकले असे बेताल वक्तव्य गंभीरने केले आहे. 

Image result for gautam gambhir and ms dhoni world cup 2011

भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात गंभीरने 97 धावांची खेळी केली होती. शतक पूर्ण करण्यासाठी तीन धावांची गरज असताना तो क्रीजमधून बाहेर येत जोरात फटका मारण्याच्या नादात तो बोल्ड झाला होता. या सामन्यात धोनीने नाबाद 91 धावांची खेळी केली होती. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. 

धोनी म्हणाला तीन धाव कर शतक होईल
''मला अनेतवेळा हा प्रश्न विचारला जातो की 97 धावांवर असताना असे काय झाले की तु बाद झाला? 97 धावा करेपर्यंत मी फक्त आणि फक्त संघाचा विचार करत होतो. माझ्या डोक्यात वैयक्तिक शतकाचा विचारही नव्हता. षटक संपल्यानंतर क्रीजवर मी आणि धोनी बोलत होतो. तेव्हा तो मला म्हणाला की तीन धावा कर आणि शतक पूर्ण कर. तेव्हा मी उत्साहित झालो आणि बाद झालो. 

गौतम गंभीर बेपत्ता

 ''अचानक जेव्हा तुम्ही स्वत:च्या धावांचा विचार करायला लागता तेव्हा तुम्ही उत्साहित होता. माझंही तेच झालं आणि मी बाद झालो. शतक करण्याचा जोश माझ्या डोक्यावर नाचू लागला होता. आजही लोक मला त्या तीन धावांबद्दल विचारतात,'' असे स्पष्टीकरण त्याने दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gautam Gambhir blames Ms Dhoni as he couldnt score a century in world cup final in 2011