Gautam Gambhir : तुम्हाला ज्यावेळी पाण्याची बाटली घेऊन पळावं लागतं... लखनौच्या मेंटॉर गंभीरने 'कॅप्टन' राहुलचे पिळले कान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Gambhir KL Rahul

Gautam Gambhir : तुम्हाला ज्यावेळी पाण्याची बाटली घेऊन पळावं लागतं... लखनौच्या मेंटॉर गंभीरने 'कॅप्टन' राहुलचे पिळले कान

Gautam Gambhir KL Rahul : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर आहे. याच संघाचा केएल राहुल हा कर्णधार आहे. नुकतेच लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2023 च्या हंगामातील आपल्या नव्या जर्सीचे अनावरण केले. यानंतर गौतम गंभीरने अनेक माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी मेंटॉर गंभीरने कोणतीही तमा न बाळगता आपला कर्णधार केएल राहुलबद्दल विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली.

राहुलने आयपीएलकडे स्वतःचा नव्याने शोध घेण्याचे एक व्यासपीठ म्हणून पहावे. यामार्फत त्याला देशाच्या संघाची मदत कशी करू शकतो याचा देखील शोध घेता येऊ शकतो असे मत गौतम गंभीरने व्यक्त केले.

गंभीर म्हणाला, 'अशा प्रकारच्या परिस्थितीतून प्रत्येक खेळाडू हा जात असतोच. तुम्ही एका तरी खेळाडूचं नाव सांगू शकता का की जो त्याच्या कारकिर्दीत सुरवातीपासून शेवटपर्यंत कामगिरीत सातत्य राखू शकला आहे. काही वेळा असे प्रसंग चांगले असतात. या गोष्टी तुम्हाला दुःख देतात. जर त्या वेदना देत असतील तर ते तुमच्यासाठी चांगले आहे.'

गौतम गंभीर पुढे म्हणाला की, 'ज्यावेळी तुम्ही दुसराच कोणी खेळतोय हे पाहता, ज्यावेळी तुम्ही हातात पाण्याची बाटली घेऊन मैदानात धावत जाता... तुम्ही एका फ्रेंचायजीचे कर्णधार आहेत. तुम्ही आयपीएलमध्ये 4 ते 5 शतके ठोकली आहेत. मात्र तुम्हाला देशाच्या टी 20 संघात स्थान मिळत नाही. तुम्ही कसोटी संघाच्या अंतिम 11 मधून वगळले जाता...'

स्पष्टवक्ता गंभीरने केएल राहुलला स्पष्ट संदेश दिला. राहुलने त्याच्या संघाला विजयापर्यंत नेण्यासाठी धावा करणे गरजेचे आहे. जर संघ हरतोय आणि तू धावा करतोय तर त्याचा फारसा उपयोग नाही.

गंभीरने म्हणतो की, 'जुम्ही आयपीएलकडे फक्त एक स्पर्धा म्हणून पाहू शकता किंवा तुम्ही याकडे स्वतःला नव्या शोधण्याचे व्यासपीठ म्हणून देखील याकडे पाहू शकता. तुम्ही स्वतःलाच विचारा की संघाला जशी गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही फलंदाजी करू शकता का? 600 धावा करणं महत्वाचं नाही. जरी तुमच्या 400 ते 500 धावा संघाच्या विजयासाठी कामी येतात हे महत्वाचे.'

(Sports Latest News)

हेही वाचा : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर