
IPL 2022 : गंभीरने CSK साठी निवडले चार खेळाडू; धोनीबद्दला हे आहे मत
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामापूर्वी कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी मंगळवारी (ता. ३०) सादर करण्याची शेवटची तारीख आहे. चार खेळाडूंना कायम ठेवल्यास संघाच्या खात्यातून ४२ कोटी रुपये कापले जातील, तर ३ खेळाडूंना कायम ठेवल्यास ३३ कोटी कमी होणार आहे. दोन खेळाडूंसाठी २४ तर एका खेळाडूला कायम ठेवणाऱ्या संघांना १४ कोटी रुपये द्यावे लागतील. गौतम गंभीरने चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळाडूंना कायम ठेवले आहे. मात्र, त्यात चॅम्पियन महेंद्र सिंग धेनीचा समावेश नाही.
सर्व संघ मालकांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) खेळाडूंची यादी पाठवली आहे. यात त्यांनी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले आणि कोणाला लिलावासाठी बाहेर काढले आहे, याची माहिती दिलेली आहे. दुसरीकडे भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने चेन्नई सुपर किंग्जसाठी त्याच्याकडून चार खेळाडूंची निवड केली आहे. गौतम गंभीरने ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, फाफ डू प्लेसिस आणि सॅम केरेन यांना कायम ठेवण्याच्या खेळाडूंच्या यादीत निवडले आहे.
हेही वाचा: उर्वशी रौतेलाचा हॉट अवतार; चाहत्यांना लावते वेड
मात्र, त्याने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची निवड केलेली नाही. असे असले तरी तो संघात कायम राहील, यात कोणतीही शंका नाही. कारण, त्याने आगामी हंगामासाठी त्याच्या उपलब्धतेची पुष्टी केली आहे. धोनी सीएसकेसाठी सर्वाधिक मानधन घेतलेल्या खेळाडूंपैकी एक आहे. फ्रेंचायझींनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची मंगळवारी घोषणा केली जाईल. सीएसकेने महेंद्रसिंग धोनीला रिटेन करण्यासाठी पहिली पसंती असल्याचे जाहीर केले होते. मात्र, याबाबत गौतम गंभीरचे मत वेगळे आहे.
Web Title: Gautam Gambhir Mahendra Singh Dhoni Csk Retention Chennai Super Kings
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..