गौतम गंभीर आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत? 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नवी दिल्ली - भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर तो काय करणार याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी त्याने प्रशिक्षक होण्याची इच्छाही व्यक्त केली होती. अशातच एका संघाने त्याला प्रशिक्षकपदाचा मानही देऊ केला आहे. 

इंडियन प्रिमियर लीगमधील किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाने त्याला ही ऑपर दिली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब त्याला ट्विटरवर पुढीव वाटचालीसाठी शुभेच्छा देत खेळांडूना प्रोत्साहन देण्यासाठी त्याची वाट पाहत असल्याचा संदेशही दिला आहे. 

त्याने फेसबुक आणि ट्विटरवरून व्हिडिओद्वारे निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. "आयुष्यातील हा सर्वांत कठिण निर्णय असून, हृदय कठोर करूनच आपण क्रिकेट कारकिर्द थांबविण्याचा निर्णय घेतला.' असे गंभीरने म्हटले होते. 

Web Title: Gautam Gambhir is now coaching role