कुंबळेंसारखा मेहनत करुन घेणारा प्रशिक्षक यांना नको: गावसकर बरसले

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जून 2017

"ठीक आहे. तुम्हाला बरे वाटत नसेल, तर आज सराव करु नका. सुटी घ्या आणि खरेदी करा,' असे सांगणारा प्रशिक्षक या संघाला हवा आहे. अनिल कुंबळे हे कर्तव्यकठोर आहेत आणि गेल्या वर्षभरात त्यांनी संघाला उल्लेखनीय यश मिळवून दिले आहे. मात्र यानंतरही ते प्रशिक्षकपदी नकोत, असे कोणाला वाटत असेल, तर अशा खेळाडूंनाच संघाबाहेर ठेवावयास हवे

मुंबई - माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या दिलेल्या राजीनाम्यासंदर्भात बोलताना भारताचे माजी कर्णधार व शैलीदार फलंदाज सुनील गावसकर यांनी सध्याच्या संघावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

"जर सध्याच्या संघामधील खेळाडूंना सराव सोडून खरेदी करण्याची मुभा मुक्तहस्ते देणारा प्रशिक्षक हवा असेल; तर अनिल कुंबळे कामासाठी नक्‍कीच योग्य नव्हेत,' असे कठोर टीकास्त्र गावसकर यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना सोडले.

"सध्याच्या संघाला कठोर प्रशिक्षक नको आहेत. "ठीक आहे. तुम्हाला बरे वाटत नसेल, तर आज सराव करु नका. सुटी घ्या आणि खरेदी करा,' असे सांगणारा प्रशिक्षक या संघाला हवा आहे. अनिल कुंबळे हे कर्तव्यकठोर आहेत आणि गेल्या वर्षभरात त्यांनी संघाला उल्लेखनीय यश मिळवून दिले आहे. मात्र यानंतरही ते प्रशिक्षकपदी नकोत, असे कोणाला वाटत असेल, तर अशा खेळाडूंनाच संघाबाहेर ठेवावयास हवे,'' अशी परखड टीका गावसकर यांनी केली.

"कुंबळे यांनी भारतासाठी एक खेळाडू म्हणून उत्तम कामगिरी केली आहे; आणि प्रशिक्षक म्हणून त्यांनी गेल्या वर्षभरात केलेली कामगिरीही अत्यंत प्रशंसनीय आहे. यामुळेच "हेडमास्तर' वा कठोर असलेला प्रशिक्षक, अशी कुंबळे यांच्यावर होणारी टीका मी सहन करणार नाही. या प्रकरणामुळे एक चुकीचा संदेशही देण्यात आलेला आहे. भारतीय संघाच्या पुढील प्रशिक्षकास आता खेळाडू म्हणतील त्यापुढे झुकावे लागेल; अन्यथा भारतीय क्रिकेटचे एक भूषण असलेल्या कुंबळेंप्रमाणे तुमचीही गच्छंती होईल, असा हा संदेश आहे. भारतीय क्रिकेटसाठी खरचं हा एक अत्यंत दु:खद दिवस आहे,'' अशी भावना गावसकर यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्‍त केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोहलीने प्रशिक्षक कुंबळे यांच्याविरुद्ध जवळपास तक्रारीच केल्याचे समजते. कोहलीची आक्रमकता पाहून आता हा वाद सामंजस्याने मिटेल असे वाटत नाही, असेही या सूत्राने सांगितले. विशेष म्हणजे केवळ कोहलीच नाही, तर संघातील अन्य काही खेळाडूदेखील कुंबळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे समजते. 

अनिल कुंबळे प्रशिक्षक म्हणून -
कसोटी - 17 सामने, 12 विजय, 1 पराभव, 4 अनिर्णित 
वन डे - 13 सामने, 8 विजय, 5 पराभव 
टी-20 - 5 सामने, 2 विजय, 2 पराभव, 1 अनिर्णित 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा ः
रामनाथ कोविंद यांना 'जदयू'चा पाठिंबा
जिल्हा बँकांना केंद्राचा दिलासा; जुन्या नोटा घेणार​
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

योगासनांमुळे जग भारताबरोबर जोडले गेले: मोदी
कर्णधाराला माझ्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप; कुंबळेंचा राजीनामा
धोनी, युवराजबाबत निर्णय घेण्याची वेळ : द्रविड
रुग्णवाहिकेसाठी रोखला राष्ट्रपतींचा ताफा​
‘योगा’त रमले आयटीयन्स​
संपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी
हीच का ती 'ऐतिहासिक' कर्जमाफी?​
#स्पर्धापरीक्षा - 'हार्ट ऑफ एशिया' परिषद

Web Title: Gavaskar slams Indian cricket team