चुरशीच्या लढतीत गीतची सरशी

गीत सेठी
गीत सेठी

मुंबई ः गीत सेठीने राष्ट्रीय मास्टर्स स्नूकर स्पर्धेत सलामीला कडव्या लढतीस सामोरे जावे लागले. त्याने केरळच्या अतीत शाहचे कडवे आव्हान 3-2 असे परतवले.

गीतने सलामीच्या लढतीत 64-36, 87-01, 36-46, 43-75, 66-29 असा विजय मिळवला. गतविजेत्या आलोक कुमारने सत्येन छाब्रियाचा 3-0 असा पाडाव केला. आलोकने ही लढत 99-10, 65-1, 62-16 अशी जिंकली.

चिराग रामकृष्णनने महाराष्ट्राच्याच अमित सागर तसेच मिथिल शिंदेला हरवले.
ही स्पर्धा वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये सुरु आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com