esakal | Video: जमालचा पहिला आंतरराष्ट्रीय गोल अन् संघ FIFA World Cup 2022 साठी ठरला पात्र
sakal

बोलून बातमी शोधा

Germany-Football

जमाल मुसियालाने ठरला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरूण फुटबॉलपटू

Video: पहिला आंतरराष्ट्रीय गोल अन् संघ World Cup साठी पात्र!

sakal_logo
By
विराज भागवत

बर्लिन: कतारमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी (FIFA Football World Cup 2022) जर्मनी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला. G गटाच्या पात्रता स्पर्धेत त्यांनी नॉर्थ मॅसेडोनिया संघाचा ४-० असा पराभव केला. नॉर्थ मॅसेडोनिया संघाविरुद्धच्या सामन्यात जर्मनीकडून टिमो वेर्नरने २ तर केल हॅवेर्त्झ आणि जमाल मुसियाला यांनी प्रत्येकी एक गोल केला.

सामन्यात जर्मनीचे सुरुवातीपासूनच वर्चस्व होते. पण पहिल्या गोलासाठी त्यांना उत्तरार्धाची वाट पाहावी लागली. उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यावर केल हॅवेर्त्झने गोल केला. त्यानंतर वेर्नरने दोन गोलांचा तडाखा दिला. सामना संपायला काही वेळ असताना मुसिआलाने आपला पहिला आंतरराष्ट्रीय गोल केला. जर्मनीचे गटामध्ये सर्वाधिक २१ गुण झाले आहेत. यात महत्त्वाची बाब म्हणजे जमाल मुसियाला याचा हा पहिला आंतरराष्ट्रीय गोल होता. त्याच्या गोलमुळे संघ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्यास मदत झाली. त्याशिवाय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल करणारा जमाल हा जर्मनीकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरूण फुटबॉलपटू ठरला.

पाहा जमालचा पहिला गोल (Video)

कतारमधील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा २१ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत होत आहेत. ३२ संघ स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. जर्मनी माजी विजेते आहेत. गतविजेते फ्रान्स पात्रता फेरीत शानदार कामगिरी करत असले, तरी ते अजून पात्र ठरलेले नाहीत. जर्मनी पात्र ठरलेल्या ज गटात रुमानिया १३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांचे दोन साखळी सामने शिल्लक आहेत. यूएएफाने दिलेल्या माहितीनुसार अर्मेनियाचा पराभव झाल्यामुळे रुमानियाही आता पात्र ठरण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

loading image
go to top