
WPL 2023 : रोमांचक सामन्यात युपीचा विजय अन् प्लेऑफमध्ये स्थान निश्चित! गुजरातसह आरसीबीही बाहेर
WPL 2023 UP vs GG : महिला प्रीमियर लीगच्या 17वा सामना यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळल्या. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात यूपी वॉरियर्सने गुजरात जायंट्सचा तीन गडी राखून पराभव केला. या विजयासह यूपी संघाने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत.
यूपी वॉरियर्सने या विजयासह गुजरात जायंट्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला स्पर्धेतून बाहेर बाहेर काढले आहे. यूपीचे सात सामन्यांतून आठ गुण झाले आहेत. त्याचबरोबर गुजरातचे आठही सामन्यांतून सहा गुण आहेत. बंगळुरूचे सध्या सात सामन्यांनंतर चार गुण आहेत. संघाने शेवटचा सामना जिंकला तरी तो जास्तीत जास्त सहा गुण मिळवू शकेल आणि यूपीशी बरोबरी करू शकणार नाही.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 6 गडी गमावून 178 धावा केल्या. दयालन हेमलताने 33 चेंडूत 57 धावा केल्या तर ऍशले गार्डनरने 39 चेंडूत 60 धावा केल्या.
179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाला पहिला धक्का दुसऱ्याच षटकात बसला जेव्हा कर्णधार अॅलिसा हिली 12 धावांवर बाद झाली. दुसरी विकेट किरण नवगिरेच्या रूपाने पडली, ती फक्त 4 धावा करू शकली. तिसरी विकेट यूपीच्या देविका वैद्यच्या रूपाने पडली, ज्याने 7 धावा केल्या. यूपीचे पुनरागमन ताहलिया मॅकग्रा आणि ग्रेस हॅरिस यांच्या नेतृत्वाखाली झाले.
ताहलिया मॅकग्राने 34 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने 10 चौकार मारले, यावरून ती फलंदाज म्हणून किती धोकादायक आहे हे दिसून आले. 38 चेंडूत 57 धावा करून मॅकग्राला ऍशले गार्डनरने बाद केले. संघाला पाचवा झटका दीप्ती शर्माच्या रूपाने बसला, ज्याला 6 धावा करता आल्या. ग्रेस हॅरिसने ७२ धावांची धडाकेबाज खेळी केली.