esakal | मॅक्सवेलने निवडले Top 5 T20 खेळाडू; किती भारतीय आहेत पाहा... | Glenn Maxwell
sakal

बोलून बातमी शोधा

Andre-Russell-Rashid-Khan

राशिद खान आणि आंद्रे रसलसह आणखी कोणाला पसंती, वाचा सविस्तर

मॅक्सवेलने निवडले Top 5 T20 खेळाडू; किती भारतीय आहेत पाहा...

sakal_logo
By
विराज भागवत

सध्या युएईमध्ये IPL 2021 स्पर्धा रंगली आहे. या स्पर्धेनंतर T20 World Cup 2021 चा थरार असणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. पण कोरोनाच्या भीतीपोटी BCCIने युएई आणि ओमानमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यामुळे IPL 2021 ही स्पर्धा म्हणजे एका अर्थाने T20 World Cup 2021 ची रंगीत तालीमच म्हणावी लागेल. या स्पर्धेच्या दृष्टीने सारेच संघ तयारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने आपल्या ICCसोबतच्या मुलाखतीत Top 5 T20 क्रिकेटपटू कोण त्याबद्दलचं मत व्यक्त केलं आहे.

हेही वाचा: कोहलीला डिवचण्याची 'रिस्क' घेणार नाही- मॅक्सवेल

ICC शी बोलताना मॅक्सवेलने त्याच्या पसंतीचे Top 5 T20 क्रिकेटपटू कोण याची माहिती दिली. मॅक्सवेल म्हणाला की पहिला सर्वोत्तम टी२० क्रिकेटपटू म्हणजे राशिद खान. राशिद हा अतिशय प्रतिभावान फिरकीपटू आहे. त्यासोबतच तो वेळप्रसंगी फटकेबाजी करून काही धावांची भरही घालू शकतो. या यादीतील दुसरा खेळाडू म्हणजे आंद्रे रसल. रसल हा वेगवान गोलंदाजी करू शकतो. तो तगडा फलंदाज आहे. तो थेट मैदानाबाहेर चेंडू मारण्याची क्षमता राखतो. तसेच, फिल्डिंगच्या दृष्टीनेही तो खूपच उत्तम आहे. त्यामुळे त्याला संघात घेतलंच पाहिजे, असं मॅक्सवेल म्हणाला.

हेही वाचा: "आता बास झालं" म्हणत ख्रिस गेलची IPL मधून तडकाफडकी माघार

राशिद आणि रसलनंतर मॅक्सवेलने इंग्लंडच्या बेन स्टोक्सला पसंती दर्शवली. बेन स्टोक्स हा असा खेळाडू आहे जो खूप चांगली कामगिरी करू शकतो. त्याच्याकडे फलंदाजीत दमदार कामगिरी करण्याची क्षमता आहे. तसेच तो सर्व प्रकारच्या परिस्थितीत चांगली कामगिरी करून दाखवू शकतो. उर्वरित दोन खेळाडू म्हणजे, अँडम गिलख्रिस्ट आणि शॉन टेट. गिलख्रिस्ट हा माझा कोणत्याही संघाचा विकेटकिपर असेलच याची मला खात्री आहे. याशिवाय, संघाला धमाकेदार सुरूवात करून देऊ शकतो. आणि शॉन टेटच्या वेगाची धडकी फलंदाजांना अजूनही आहे त्यामुळे तो माझा पाचवा खेळाडू असेल, मॅक्सवेल म्हणाला.

loading image
go to top