मी वेडा होतोय, प्लिज मला क्रिकेटपासून लांब राहुद्या!

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

त्याच्या मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने त्याला काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. तयामुळे त्याने क्रिकेटपासून काहीकाळ लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. तो सपोर्ट स्टाफसोबत यावर काम करत आहे.

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा अष्टपैलू सध्या मानसिक अस्वास्थतेतून जात आहे आणि म्हणूनच त्याने क्रिकेटपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. ग्लेन मॅक्सवेल सध्या मानसिक तणाखाली असल्याने त्याने अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

Video : चेंडूच तो! 147 किमी वेगाने आलेला, थेट मैदानाबाहेर भिरकावला

त्याच्या या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. कारण तो सध्या चांगल्या फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात सध्या ट्वेंटी20 मालिका सुरु आहे. त्याने या मालिकेतूनही माघार घेतली आहे. त्यामुळे तो तिसऱ्या सामन्यात खेळणार नाही. त्यानंतर मायदेशात पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेसही तो मुकणार आहे. 

Image result for glenn maxwell hd images

ऑस्ट्रेलियाने मॅक्सवेलच्या जागी डॅर्सी शॉर्टला संघात स्थान दिले आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात त्याने शानदार फलंदाजी केली होती. त्याने 28 चेंडूमध्ये 62 धावा केल्या होत्या. 

''त्याच्या मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने त्याला काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. तयामुळे त्याने क्रिकेटपासून काहीकाळ लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. तो सपोर्ट स्टाफसोबत यावर काम करत आहे'' असे संघाच्या मानसोपचार तज्ञांचे म्हणणे आहे. 

BCCIची एक चूक आणि भुवनेश्वरचे आख्खं करिेअर धोक्यात!

संघ व्यवस्थापक बेन ऑलिव्हर यांनी मॅक्सवेलला संघाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, ''खेळाडूंच्या स्वास्थ्यालाच आमचे प्राधान्य आहे. आमच्या सर्वांचा मॅक्सवेलला पूर्ण पाठिंबा आहे. त्याला पुन्हा मैदानात उतरविण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करु. आता त्याला आणि त्याच्या परिवाराला सध्या एकांताची गरज आहे. तो ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा खूप महत्वाचा भाग आहे आणि तो लवकरच पुन्हा संघात स्थान मिळवेल.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Glenn Maxwell On Indefinite Break From Cricket Due To Mental Health Issues