IPL 2020 : अभी जोश बाकी है! मॅक्सवेल आयपीएलच्या लिलावात

वृत्तसंस्था
बुधवार, 4 डिसेंबर 2019

मायदेशात होणाऱ्या ट्‌वेन्टी- विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पूर्ण तंदुरुस्त रहाण्याकरिता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे. महत्वाचे खेळाडू आपापल्या संघात कायम राखल्यानंतर उर्वरित खेळाडूंचा लिलाव कोलकाता येथे होणार आहे. 

नवी दिल्ली : मायदेशात होणाऱ्या ट्‌वेन्टी- विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पूर्ण तंदुरुस्त रहाण्याकरिता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे. महत्वाचे खेळाडू आपापल्या संघात कायम राखल्यानंतर उर्वरित खेळाडूंचा लिलाव कोलकाता येथे होणार आहे. 

माहितीये का, अजिंक्य रहाणे दोन वर्षानंतर कोणत्या संघातून पुन्हा खेळणार आहे?

मिशेल स्टार्क माघार घेत असताना ग्लेन मॅक्‍सवेल आणि त्याचा ऑस्ट्रेलिया संघातील सहकारी ख्रिस लीन मात्र आयपीएलमध्ये खेळण्यास उत्सुक आहेत. मानसिक स्थिती बिघडल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघातून माघार घेतलेला मॅक्‍सवेल अजून ऑस्ट्रेलिया संघात परतलेला नाही. आयपीएलसाठी उपलब्धता त्याने कळवलेली आहे. मॅक्‍सवेलप्रमाणे ख्रिस लीन यांना दोन कोटींची पायाभूत किंमत मिळणार आहे. 

Image result for glenn maxwell IPL

स्टार्क आयपीएल खेळणार नसला करी त्याचे ऑस्ट्रेलिया संघातील नव्या चेंडूचे सहकारी पॅट कमिंस आमि जोश हेझलवूड, मिशेल मार्श यांनी आयपीएल खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हेझलवूड याअगोदरही लिलावासाठी उपलबद्ध होता, त्याची निवडही झाली होती, परंतु ऐनवेळी त्याने माघार घेतलेली आहे. 

डेल स्टेनही आयपीएल पुनरागमनासाठी उत्सुक आहे. दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस आणि श्रीलंकेचा अँजेलो मॅथूही लिलावातून आपले नशिब आजमावणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Glenn Maxwell to play in IPL 2020