आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग स्पर्धेत भारताला तीन सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नवी दिल्ली - भारताच्या सुमीत संगवान (९१ किलो), आणि हिमांशू शर्मा (४९ किलो) यांनी पुरुष तर महिला विभागात निखत झरीन (५१ किलो) हिने बेलाग्रेड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारताने तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि पाच ब्राँझपदकांची कमाई केली. फिजिओशिवाय भारतीय खेळाडूंनी केलेली ही कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली.

हिमांशूने अल्जेरियाच्या महंमद तौआरेह याचा ५-० असा सहज पराभव केला. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या सुमीतने सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करणाऱ्या आशियाई रौप्यविजेता सुमीतने इक्वेडोरच्या कॅस्टिलो टोरेस याचे आव्हान ५-० अशाच फरकाने मोडून काढले. सुिमतने हा विजय भविष्यातील स्पर्धेसाठी प्रेरक ठरेल असे सांगितले.

महिलांमध्ये कुमार गटातील माजी विश्‍वविजेती निखत हिने खांद्याच्या दुखापतीनंतर सर्वोत्तम कामगिरी करताना ग्रीसच्या के. ऐकेटेरिनी हिचा गुणांवर पराभव केला.

Web Title: gold medal in international boxing competition