आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पुणे - भारतात प्रथमच घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ह्रदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवडमधील कोया फिटनेस अकादमीच्या मुलींनी सुवर्ण आणि कांस्यपदकाची कमाई केली आहे. 

स्वरा महाबळेश्‍वरकरने १० वर्षांखालील वयोगटात एक सुवर्ण आणि एक कांस्यपदक पटकावले. तसेच १२ वर्षांखालील वयोगटात रूही कौलगीकरने कांस्यपदक पटकावले. काशवी ठाकोर, अवनी नहार, यावी मेहता, आदिश्री कुलकर्णी, धानवी चोरडिया, सई दानी, शालवी शहा, रिदम मुथ्था, केया खैरनार व प्रेरणा धर्मानी आदी खेळाडूंनी नैपुण्य दाखवले. 

सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व परीक्षक आदिश्री राजपूत व संस्थेचे सहायक प्रशिक्षक रश्‍मी पर्णीकर यांनी मार्गदर्शन केले. 

या स्पर्धेत भारतासह एकूण ६ देशांचा सहभाग होता.

Web Title: Gold Medal in International Gymnastic competition

टॅग्स