सरस प्रतिस्पर्ध्यांविरुद्धचे आक्रमण सुखावणारे : गोपीचंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

चिराग-सात्विकचा उंचावत असलेला आत्मविश्‍वास तसेच त्यांनी त्यांच्यापेक्षा सरस प्रतिस्पर्ध्यांचा न डगमगता केलेला सामना, त्यांच्याविरुद्धचे आक्रमण जास्त सुखावणारे आहे, असे मत भारताचे राष्ट्रीय मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.

मुंबई : चिराग-सात्विकचा उंचावत असलेला आत्मविश्‍वास तसेच त्यांनी त्यांच्यापेक्षा सरस प्रतिस्पर्ध्यांचा न डगमगता केलेला सामना, त्यांच्याविरुद्धचे आक्रमण जास्त सुखावणारे आहे, असे मत भारताचे राष्ट्रीय मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.

सात्विक-चिरागचा खेळ चांगला होत आहे. त्यांचा खेळ एकमेकांना पूरक होत आहे. काहीशी संधी असताना दुसरा गेम त्यांच्या हातून निसटला, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी आपला तोच जोष कायम ठेवला. त्यांनी महत्त्वाच्या लढतीत आपला खेळ उंचावला. प्रत्येक रॅलीस प्रत्युत्तर दिले, हे अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे, असे गोपीचंद यांनी "सकाळ'ला सांगितले.

चिराग आणि सात्विकची कामगिरी सतत चांगली होत आहे. त्यांना या प्रकारच्या यशाची आवश्‍यकता होती. ते त्यांनी मिळवले आहे. उपांत्य आणि अंतिम फेरीत आजी-माजी जागतिक विजेत्यांना त्यांनी पराजित केले, हे नक्कीच सोपे नसते. ते कधीही डगमगले नाहीत. त्यांचा आपण काय करू शकतो यावर विश्‍वास होता. त्यांच्या कठोर परिश्रमास लाभलेले हे फळ आहे आणि ही केवळ सुरुवात आहे, असेही त्यांनी नमूद केले.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gopichand happy by the performance of satwik and chirag

टॅग्स