‘माझी दोन अनमोल रत्ने’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

नवी दिल्ली - साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या सर्वांत यशस्वी बॅडमिंटनपटूंची तुलना गुरू गोपीचंद यांनी हिऱ्याशी केली आहे. ‘माझी दोन अनमोल रत्ने’ अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. 

साईनाने गेल्याच महिन्यात सिंधूचाच पराभव करून राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक पटकावले होते. त्यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद मिळविताना साईनाने सिंधूचाच पराभव केला होता. या दोघी अनुभवातून खूप शिकत गेल्या. आपल्या खेळात सुधारणा करण्यासाठी त्या प्रत्येक वेळी उत्सुक असतात.

त्यामुळेच त्या माझ्या आवडत्या शिष्या आहेत. या दोघींविषयी बोलताना त्यांचे प्रशिक्षक गोपीचंद म्हणाले, ‘‘विजय आणि पराजय हे खेळात होतच असतात. या दोन्ही गोष्टी शेवटी खेळाडूला प्रेरणाच देत असतात. या दोघींची वाटचाल अशीच आहे. माझ्यासाठी या दोघी म्हणजे ‘अनमोल रत्न’च आहेत.’’

‘फिक्की’च्या महिला शाखेच्या वतीने आयोजित गौरव सोहळ्यात ते बोलत होते. माझ्यासाठी प्रत्येक खेळाडू सारखाच आहे. माझ्या खेळाडूने ऑलिंपिकचे सुवर्णपदक मिळवावे, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी त्यांच्याशी स्पर्धेदरम्यान कडक वागतो, असे सांगून ते म्हणाले, ‘‘माझ्या खेळाडूने जिंकलेच पाहिजे, असे मला नेहमी वाटते. साईना असो वा सिंधू मी स्पर्धेदरम्यान प्रत्येक खेळाडूचे मोबाईल जप्त करतो. त्यांच्या खोलीची झडती घेऊन लॅपटॉपचीही पाहणी करतो. त्यांनी चॉकलेट्‌सचा साठा करून ठेवला नाही ना यासाठी खोलीतील रेफ्रिजरेटरही तपासतो.’’

Web Title: gopichand talking badminton saina nehwal p. v. sindhu