Ashes 2019 : ..तर माझ्या बहिणीचं स्टोक्सशी लग्न लावलं असतं!

वृत्तसंस्था
Tuesday, 27 August 2019

''मला बहीण नाही, मात्र असती तर मी तिचं बेन स्टोक्सशी लग्न लावून दिलं असतं,'' अशी दिलखुलास प्रतिक्रिया ग्रॅमीने दिली आहे. 

लंडन : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ऍशेस मालिकेतील लीड्स कसोटीत इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने आपल्या जिगरबाज खेळीने इंग्लंडला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीनंतर क्रिकेटविश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वान यानेही त्याच्या बहिणीचं लग्न बेन स्टोक्ससोबत लावण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

''मला बहीण नाही, मात्र असती तर मी तिचं बेन स्टोक्सशी लग्न लावून दिलं असतं,'' अशी दिलखुलास प्रतिक्रिया ग्रॅमीने दिली आहे. 

दरम्यान स्टोक्सने धीरोदात्त नाबाद 135 शतकी खेळी करून त्याने इंग्लंडला ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ एक गडी राखून विजय मिळवून दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grammy Swan praises Ben stokes by saying I would have ake my sister marry Ben Stokes