पी. व्ही. सिंधूला विजेतेपद

पीटीआय
सोमवार, 3 एप्रिल 2017

नवी दिल्ली - भारतीय बॅडमिंटनची सम्राज्ञी पी. व्ही. सिंधूने दिल्ली जिंकली आहे. शरीरवेधी स्मॅशचा धडाका करीत सिंधूने ऑलिंपिकविजेत्या कॅरोलिन मरिनला तिच्या क्षमतेचा पूर्ण कस बघण्यास भाग पाडले, पण अखेर ऑलिंपिक विजेती मरिन हिला सलग दुसऱ्यांदा सिंधूसमोर शरणागती पत्करावी लागली. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूने ऑलिंपिक विजेतीचा प्रतिकार २१-१९, २१-१६ असा सहज मोडून काढला. 

नवी दिल्ली - भारतीय बॅडमिंटनची सम्राज्ञी पी. व्ही. सिंधूने दिल्ली जिंकली आहे. शरीरवेधी स्मॅशचा धडाका करीत सिंधूने ऑलिंपिकविजेत्या कॅरोलिन मरिनला तिच्या क्षमतेचा पूर्ण कस बघण्यास भाग पाडले, पण अखेर ऑलिंपिक विजेती मरिन हिला सलग दुसऱ्यांदा सिंधूसमोर शरणागती पत्करावी लागली. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूने ऑलिंपिक विजेतीचा प्रतिकार २१-१९, २१-१६ असा सहज मोडून काढला. 

सिंधूने पाऊणतास चाललेली ही लढत जिंकल्यावर गोपीचंद यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य मरिनला रोखण्याची योजना यशस्वी ठरली हेच दाखवणारे होते. सिंधूने लढत संपल्यावर प्रथम गोपीचंद यांच्याकडे जाऊन जणू त्यांचे आभार मानले आणि त्यानंतरच मरिनशी हस्तांदोलन केले. रिओ ऑलिंपिकच्या अंतिम लढतीत तीन गेममध्ये हार पत्करल्यानंतर सिंधूने मरिनला दुबईत दोन गेममध्ये हरवले होते; पण त्या वेळी मोसम संपत आहे. मरिन थकलेली आहे, असे सांगून सिंधूच्या विजयाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र या वेळी सिंधूने पूर्णपणे तंदुरुस्त असलेल्या मरिनला तिचा खेळ करण्याची संधीच दिली नाही. 

रिओ तसेच त्यापूर्वीच्या लढतीत मरिनने नेटजवळ जास्त चकमकी करण्यास सिंधूला भाग पाडले होते, पण सिंधूने आज सुरवातीपासून जम्प स्मॅश आणि ड्रॉप्सचा धडाका सुरुच केला. मरिनला हलकेच रॅली करुन आपल्याला नेटजवळ खेचण्याची संधीच मिळणार नाही, ही खबरदारी सिंधू घेत होती. सिंधूच्या सुरवातीच्या क्रॉस कोर्ट स्मॅशना मरिनकडे उत्तर नव्हते. अर्थात मरिनचा प्रतिकार सुरुच होता. तिने प्रसंगी स्मॅशला स्मॅशने उत्तर देत होती, तिने सिंधूची ६-१ आघाडी ११-९ अशी कमी केली. एवढेच नव्हे तर १९-१८ अशी आघाडी घेतली; पण सिंधूने सलग तीन गुण घेत पहिला गेम जिंकला. 

रिओतही सिंधूने पहिला गेम २१-१९ जिंकला होता, पण त्यानंतर लढत कशी संपवायची, आघाडीचा कसा उपयोग करायचा हे शिकलो आहोत, हेच आता सिंधू दाखवत होती. दुसऱ्या गेममध्ये सिंधूची सुरुवात जबरदस्त होती. तिला आता मरिन काय करणार याची जणू पुरेपूर कल्पना आली होती व तेच निर्णायक ठरत होते. सिंधूने दुसऱ्या गेमच्या सुरुवातीस आघाडी घेतल्यावर प्रेक्षक बेभान झाले होते. त्याचे दडपण न घेता तिने खेळावर लक्ष केंद्रित केले होते. दुसऱ्या गेममधील ब्रेकनंतर मरिन नेट रॅलीजच्या जोरावर प्रतिकार करू लागली; पण तो फार वेळ टिकला नाही. सिंधूची आघाडी कायम राहिली आणि तिच्या ताकदवान स्मॅशेस निकाल स्पष्ट करीत गेल्या.

दरम्यान, पुरुष एकेरीत व्हिक्‍टर ॲक्‍सेलसेन याने विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत कत्याने चोऊ तिएन चेन याचे आव्हान २१-१३, २१-१० असे मोडून काढले. मिश्र दुहेरीत विजेतेपद मिळविताना लु कई-हुआंग याकिओंग जोडीने झेंग सिवेई-चेन क्विंगचेन जोडीचे आव्हान २२-२४, २१-१४, २१-१७ असे संपुष्टात आणले. पुरुष दुहेरीत शिहो तनाका-कोहारू योनेमोटो जोडीने विजेतेपद मिळविले. त्यांनी नाओको फुकुमन-कुरुमी योनाओ जोडीचा १६-२१, २१-१९, २१-१० असा पराभव केला.

Web Title: Greatest Victories of Ace India Shuttler PV Sindhu