हिरवाणींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल - चहल 

वृत्तसंस्था
सोमवार, 14 मे 2018

भारताचा लेगस्पिन गोलंदाज युझवेंद्र चहल इंग्लंड दौऱ्यापूर्वी मिळणाऱ्या एक महिन्याच्या विश्रांतीचा फायदा उठविण्याचा विचार करत असून, त्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत नरेंद्र हिरवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करणार आहे. 
एकदिवसीय क्रिकेटमध्ये अलीकडे युझवेंद्र आणि "चायनामन' कुलदीप यादव भारताचे प्रमुख फिरकी गोलंदाज ठरत आहेत. गेल्यावर्षी जून महिन्यात चॅंपियन्स करंडकापासून ही जोडी एकत्र आली. तेव्हापासून त्यांनी 23 एकदिवसीय सामन्यात 43, तर 21 टी 20 सामन्यात 35 विकेट्‌स मिळविल्या आहेत. त्यामुळे आगामी इंग्लंड दौऱ्यातही संधी मिळाल्यावर त्यांच्याकडेच अधिक लक्ष जात आहे. 

नवी दिल्ली - भारताचा लेगस्पिन गोलंदाज युझवेंद्र चहल इंग्लंड दौऱ्यापूर्वी मिळणाऱ्या एक महिन्याच्या विश्रांतीचा फायदा उठविण्याचा विचार करत असून, त्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत नरेंद्र हिरवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करणार आहे. 
एकदिवसीय क्रिकेटमध्ये अलीकडे युझवेंद्र आणि "चायनामन' कुलदीप यादव भारताचे प्रमुख फिरकी गोलंदाज ठरत आहेत. गेल्यावर्षी जून महिन्यात चॅंपियन्स करंडकापासून ही जोडी एकत्र आली. तेव्हापासून त्यांनी 23 एकदिवसीय सामन्यात 43, तर 21 टी 20 सामन्यात 35 विकेट्‌स मिळविल्या आहेत. त्यामुळे आगामी इंग्लंड दौऱ्यातही संधी मिळाल्यावर त्यांच्याकडेच अधिक लक्ष जात आहे. 

अर्थात, चहल आणि कुलदीप दोघांनाही यापूर्वी इंग्लंडचा अनुभव नाही. त्यामुळेच आयपीएलनंतर मिळणाऱ्या सहा आठवड्यांचा वेळ आपण इंग्लंडविरुद्धच्या तयारीसाठी घालवणार आहोत, असे चहलने सांगितले. तो म्हणाला,""इंग्लंडपूर्वी आम्ही आयर्लंडचा दौरा करणार आहोत. तेथील हवमानही इंग्लंडप्रमाणेच राहील. त्यामुळे या दौऱ्याला निघण्यापूर्वी माझे प्रशिक्षक नरेंद्र हिरवाणी यांच्याबरोबर चर्चा करून आपण त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण टिप्स घेणार आहोत. त्यांच्याकडून मिळणाऱ्या टिप्स माझ्यासाठी नक्कीच फायद्याच्या ठरतील.'' 

यंदाच्या आयपीएलमध्ये चहलला फारशा विकेट्‌स मिळाल्या नाहीत. पण, तो आपल्या कामगिरीवर समाधानी आहे. तो म्हणाला, ""या मोसमात मला विकेट्‌स मिळाल्या नसल्या, तरी माझ्या गोलंदाजीवर धावाही भरपूर निघालेल्या नाहीत. म्हणजेच फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात मी यशस्वी ठरलो आहे. एक गोलंदाज म्हणून मला आणखी काय हवे. मी या कामगिरीवर समाधानी आहे.'' 

Web Title: guidance of Hirwani should be important