जिम्नॅस्टिकच्या संघटनात्मक वादावर अखेर तोडगा

भारतीय जिम्नॅस्टिक महासंघातील वाद अखेर संपला आहे
भारतीय जिम्नॅस्टिक महासंघातील वाद अखेर संपला आहे

मुंबई : दीर्घ काळ सुरू असलेला भारतीय जिम्नॅस्टिकमधील अंतर्गत संघर्ष अखेर सात वर्षांनी संपला आहे. केंद्रीय क्रीडा खाते तसेच भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत अखेर जिम्नॅस्टिक महासंघावर नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.

भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या कार्यालयातच झालेल्या जिम्नॅस्टिक महासंघाच्या निवडणुकीत सुधीर मित्तल यांची अध्यक्षपदी; तर शांतीकुमार सिंग यांची सचिवपदी निवड करण्यात आली. मित्तल 2003 ते 2007 या कालावधीत महासंघाचे अध्यक्ष होते. ते पंजाबमधील माजी प्रशासकीय अधिकारी आहेत; तर शांतीकुमार माजी राष्ट्रीय जिम्नॅस्ट आहेत. ते 2011 ते 2016 या कालावधीत महासंघाचे कोषाध्यक्ष होते; तसेच ते त्यानंतर महासंघाचे सचिवही होते.

ऑगस्ट 2012 मध्ये जिम्नॅस्टिक महासंघाची संलग्नता क्रीडा खात्याने रद्द केली होती. अंतर्गत संघर्षामुळे हा निर्णय झाला होता. तेव्हापासून महासंघास कोणताही निधी दिला जात नव्हता. खरं तर ऑगस्टमध्ये सुधाकर शेट्टी आणि शांतीकुमार सिंग यांच्या गटाने तडजोडीचा फॉर्म्युला तयार केला होता, पण जागतिक महासंघाने त्यास विरोध करून सर्वमान्य संघटना हवी असा आग्रह धरला. आता नव्या निवडीच्यावेळी जागतिक महासंघाचे प्रतिनिधी असल्याने भारतीय महासंघाच्या आंतरराष्ट्रीय महासंघाच्या संलग्नतेबाबत आक्षेप नसेल अशी अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com