सिमोना हालेपकडून नाओमीचा धुव्वा

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

रोम - रुमानियाच्या सिमोना हालेपने इटालियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत जपानच्या नाओमी ओसाकाचा ६-१, ६-० असा धुव्वा उडविला. जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान राखण्यासाठी सिमोनाला या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरीची गरज आहे. तिला किमान उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची गरज आहे. नाओमीविरुद्ध मार्च महिन्यात इंडियन वेल्समधील स्पर्धेत ती केवळ तीन गेमच्या मोबदल्यात गारद झाली होती.

या वेळी नाओमीने २-० अशी आघाडी घेण्याची संधी दवडली. तिने चार ब्रेकपॉइंट वाया घालविले. त्यानंतर ती सलग ११ गेम हरली. पहिल्या मॅचपॉइंटला नाओमीने ‘सेकंड सर्व्ह’ असूनही चेंडू परतविण्याचा नुसता प्रयत्नसुद्धा केला नाही. गेल्या वर्षी सिमोनाने अंतिम फेरी गाठली होती; पण तिचा घोटा मुरगाळला. त्यामुळे तिला एलिना स्विटोलिनाविरुद्ध पराभूत व्हावे लागले. सिमोनाची अव्वल क्रमांकासाठी डेन्मार्कच्या कॅरोलीन वॉझ्नीयाकीशी चुरस आहे.

Web Title: Halep routs Osaka in Rome