हार्दिक पांड्या पुन्हा चढणार बोहल्यावर; 'या' दिवशी घेणार सात फेरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya

Hardik Pandya: हार्दिक पांड्या पुन्हा चढणार बोहल्यावर; 'या' दिवशी घेणार सात फेरे

भारताच्या संघातून मोठी अपडेट समोर आली आहे. भारताचा धडाकेबाज क्रिकेट हार्दिक पांड्या पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याची माहिती समोर आली आहे. पांड्या सध्या ब्रेकवर आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पांड्या पुन्हा कोणासोबत लग्नगाठ बांधतोय असा सवाल उपस्थित होत आहे.

हार्दिक पांड्याने २०२० मध्ये अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत कोर्ट मॅरेज केले होते. त्या दोघांना अगस्त नावाचा एक मुलगाही आहे.

दोघे पुन्हा आता लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक पुन्हा एकमेकांशी लग्न करणार आहेत. एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, हे जोडपे १४ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये एका भव्य समारंभात पुन्हा एकदा सात फेरे घेतील.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांचा विवाह सोहळा १३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून १६ पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमात हळद, मेहंदी आणि संगीत असे कार्यक्रम होणार आहेत.

हार्दिक आणि नताशाची अशी झाली भेट

एका नाईट क्लबमध्ये आमची भेट झाली होती. तिला माहिती नव्हतं की मी कोण आहे? एकमेकांशी बोलता बोलता भेटीचं रुपांतर ओळखीत झालं. जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी हॅट घातली होती. रात्री एक वाजता हॅट घालून, गळ्यात चैन आणि हातात घड्याळ घालून बसलो होतो.

तेव्हा तिला मी थोडा विचित्र वाटलो. पण आम्ही आमचं बोलणं सुरुच ठेवलं. त्यानंतर खऱ्या अर्थाने एकमेकांना ओळखू लागलो आणि डेट करणं सुरु केलं. असं हार्दिक पांड्यानं मुलाखतीत सांगितलं होतं.

हार्दिकनं केलं होत प्रपोज

वर्ष 2020 च्या न्यू ईयर पार्टीत हार्दिकने नताशाला अनोख्या अंदाजात प्रपोज केलं. तसेच अंगठी घालत आपल्या प्रेमाची कबुली दिली. या आनंदी क्षणांचा व्हिडीओ हार्दिक पांड्याने शेअर करत लिहिलं होतं की, “मे तेरा तू मेरी, जाने सारा हिंदुस्तान”.

हार्दिकने मुलाखतीत सांगितलं होतं की, माझ्या आई वडिलांना माहिती नव्हतं की मी नताशासोबत साखरपुडा करणार आहे. इतकंच काय तर माझा भाऊ कृणाल पांडाला मी दोन दिवसांपूर्वी याबाबत सांगितलं होतं.

हार्दिक आणि नताशानं 31 मे 2020 रोजी लग्न करत आपल्या चाहत्यांना खूशखबर दिली. 30 जुलै 2020 रोजी नताशानं बाळाला जन्म दिला. या बाळाचं नाव अगस्त्य ठेवलं आहे.

टॅग्स :hardik pandya