Hardik Pandya Wedding : लग्नानंतर हार्दिक पांड्या - नताशा स्टॅन्कोविकचा 'झिंगाट' डान्स VIDEO तुफान व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya Second Wedding

Hardik Pandya Wedding : लग्नानंतर हार्दिक पांड्या - नताशा स्टॅन्कोविकचा 'झिंगाट' डान्स VIDEO तुफान व्हायरल

Hardik Pandya Second Wedding : भारताचा टी 20 कर्णधार हार्दिक पांड्याने नुकतेच 14 फेब्रुवारीला दुसरे लग्न केले. दचकू नका त्याने आपली पत्नी नताशा स्टॅन्कोविकसोबतच दुसरा विवाह सोहळा साजरा केला. हा विवाह सोहळा राजस्थानातील उदयपूर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोन्ही कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होता.

हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी आपल्या लॉकडाऊनमधील विवाह सोहळ्याला तीन वर्षांनी एक ग्रँड स्वरूप दिले. यावेळी त्यांनी सात फेरे न घेता ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली. लग्नानंतर हे पुनःश्च नवविवाहित झालेल्या जोडप्याने एक ग्रँड पार्टी देखील दिली. सध्या या पार्टीतील हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविकचा झिंगाट डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हार्दिक पांड्याने आपल्या दुसऱ्या शाही विवाहाचे फोटो शेअर करत लिहिले की, 'आम्ही तीन वर्षापूवी घेतलेली शपथ पुन्हा एकदा घेतली. प्रेमाच्या या बेटावर आम्ही आमचा व्हॅलेंटाईन डे साजरा केला. प्रेमाचा उत्सव साजरा करताना कुटुंब आणि मित्रांनी दिलेली साथ पाहून मी धन्य झालो.'

हार्दिक पांड्याने 2020 मध्ये लॉकडाऊन असताना नताशा स्टॅन्कोविकसोबत लग्न केले होते. त्यावेळी त्याने पारंपरिक हिंदू पद्धतीने सात फेरे घेऊन लग्न केले होते. मात्र त्यावेळी लॉकडाऊन असल्याने हा विवाह सोहळा साध्या आणि अत्यंत कौटुंबिक पद्धतीने झाला होता.

बहुदा त्यामुळेच हार्दिक आणि नताशा यांनी दुसऱ्यांदा लग्नाचा घाट घातला. यावेळी त्यांनी राजस्थान मधील एक पॅलेसच बुक करत आपला हा विवाहसोहळा शाही केला. विशेष म्हणजे यावेळी त्यांचा मुलगा अगस्त देखील साक्षीला होता. अगस्तच्या जन्म देखील 2020 मध्येच झाला होता.

(Sports Latest News)