हार्दिकच्या फिटनेसबाबत 'बीसीसीआय' अधिकाऱ्यांचा खुलासा; म्हणाले...

वृत्तसंस्था
सोमवार, 13 जानेवारी 2020

नेटमध्ये दोन-तीन तास गोलंदाजीचा सराव केल्यावर तो त्याच्या कामगिरीवर समाधानी नव्हता.

मुंबई : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी झालेल्या तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरला. त्यामुळे त्याला न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारत 'अ' संघातून त्याला माघार घ्यावी लागली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्याच्याऐवजी विजय शंकरची निवड करण्यात आली. मात्र, तो तंदुरुस्ती चाचणीत पास झाला असल्याचे आता समोर आले आहे.

Image may contain: one or more people, people playing sport and outdoor

- T20 World Cup : भारतीय संघाची घोषणा; 15 वर्षीय क्रिकेटपटूचा समावेश

भारतीय संघाच्या फिजिओंच्या मते हार्दिक तंदुरुस्ती चाचणीत पास तर झाला मात्र, तो शंभर टक्के बरा झाला नसल्याने त्याने या दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्याला पुनरागमन करण्यासाठी आणखी थोड वेळ हवा आहे.

Image may contain: 1 person, beard and outdoor

- पुनरागमनानंतर पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारा पुन्हा संघाबाहेर

''नेटमध्ये दोन-तीन तास गोलंदाजीचा सराव केल्यावर हार्दिक त्याच्या कामगिरीवर समाधानी नव्हता. त्याच्या शरीराने एवढ्यावेळ गोलंदाजी करण्याला साथ दिली नाही. त्यामुळे त्याने या मालिकेतून माघार घेतली.

Image may contain: 1 person, playing a sport, sitting and outdoor

- INDvsAUS : 'तापट' कोहली भिडणार 'स्लेजिंग'च्या बादशाहांना

हार्दिक झोपेतही यो-यो चाचणी पास होईल. तो आता त्याच्या पुनरागमनावर पुन्हा लक्ष केंद्रीत करणार आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुनरागमन करण्याच्या तयारीला लागला आहे,'' असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Image may contain: 1 person, playing a sport, stadium and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hardik Pandya did not fail fitness test informed by BCCI official