बघा हार्दिक पंड्याचा भन्नाट नवा टॅटू

Sakal | Friday, 26 July 2019

भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. आताही तो पुन्हा चर्चेत आला आहे मात्र, यावेळी ते त्याच्या टॅटूमुळे. त्याने त्याच्या डाव्या हातावर सिंहाचा भन्नाट टॅटू काढून घेतला आहे. 

नवी दिल्ली : भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. आताही तो पुन्हा चर्चेत आला आहे मात्र, यावेळी ते त्याच्या टॅटूमुळे. त्याने त्याच्या डाव्या हातावर सिंहाचा भन्नाट टॅटू काढून घेतला आहे. 

त्याने स्वत: नव्या टॅटूचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारतीय संघाचा तीन ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौरा सुरु होणार आहे. मात्र, पंड्याला दुखापत झाल्याने त्याला कोणत्याही संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याला या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. 

विश्वकरंडकात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. तो 15व्या षटकानंतर उपचारासाठी पेव्हेलियनमध्ये गेला होता त्यानंतर तो 21व्या षटकात पुन्हा मैदानात आला.