Hardik Pandya Test : हार्दिक पांड्या कसोटी संघात परतणार; WTC अंतिम सामन्यापूर्वी निवड समिती... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya Test Team Return

Hardik Pandya Test : हार्दिक पांड्या कसोटी संघात परतणार; WTC अंतिम सामन्यापूर्वी निवड समिती...

Hardik Pandya Test Team Return : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने टी 20 पाठोपाठ वनडे संघात देखील यशस्वीरित्या पुनरागमन केले. टी 20 चा तर तो कर्णधार देखील झाला असून वनडे संघाची धुरा देखील त्याच्या खांद्यावर सोपवण्याची चर्चा सुरू झाली आहे.

मात्र जरी हार्दिक पांड्याने कारकीर्द धोक्यात टाकणाऱ्या पाठीच्या दुखापतीवर मात करत व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन केले असले तरी तो कसोटी संघापासून बऱ्याच काळ दूर आहे. मात्र आता तो फिट झाल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे तो कसोटी संघात कधी परतणार याची चाहते वाट पाहत आहेत. याबाबत आता बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इंग्लंडमध्ये होणाऱ्या WTC फायनल सामन्यापूर्वी हार्दिकच्या कसोटी पुनरागमनाबाबत चर्चा केली जाईल असे सांगितले. बीसीसीआय अधिकारी म्हणाला की, 'हार्दिक पांड्या कसोटी संघात परतण्याची कोणतीही घाई नाही. मात्र हो या विषयी थोडी स्पष्टता असणे गरजेचे आहे. आम्ही या विषयी WTC Final च्या आधी कधीतरी चर्चा करू. बुमराहच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या हा इंग्लंडमध्ये महत्वाची भुमिका बजावू शकतो. मात्र त्याच्यावर त्वरित कसोटी क्रिकेट खेळण्याचा कोणताही दबाव असणार नाही.'

बीसीसीआय अधिकारी पुढे म्हणाला की, 'कसोटी संघाचा विचार केला तर सध्याच्या घडीला हार्दिक पांड्या निवडीसाठी उपलब्ध नाहीये. तुम्ही त्याच्या दुखापतींचा इतिहास देखील लक्षात घेतला पाहिजे. त्याला तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये लगेच खेळवणे धोक्याचे ठरू शकते. जर एनसीए आणि वैद्यकीय टीम तसेच खुद्द हार्दिक पांड्याला जर तो कसोटीत पुनरागमन करण्यासाठी फिट आहे असे वाटत असेल तर तो नक्कीच संघात असेल.'

(Sports Latest News)

हेही वाचा : डेट फंडातही आकर्षक परताव्याची संधी..पण गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा...