हरमनप्रीत, स्मृती करणार नेतृत्व

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

नवी दिल्ली - यंदाच्या आयपीएल मोसमात होणाऱ्या महिलांच्या प्रदर्शनीय सामन्यासाठी हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांना कर्णधार करण्यात आले आहे. ‘बीसीसीआय’ने बुधवारी ही घोषणा केली. 

‘प्ले-ऑफ’ सामन्याच्या आधी २२ मे रोजी हा महिलांचा एकमात्र सामना खेळविला जाणार आहे. एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेतील भारतीय संघाच्या यशानंतर हा निर्णय घेण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंडमधील खेळाडू खेळणार आहेत. या साठी निवडण्यात येणाऱ्या दोन संघांचे नेतृत्व करण्यासाठी हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांची निवड केल्याचे बीसीसीआयने आज जाहीर केले.

महिलांनाही आयपीएल सारख्या मोठ्या व्यासपीठावर खेळता यावे यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचे सांगताना आयपीएलचे कार्याध्यक्ष राजीव शुक्‍ला यांनी सांगितले. हा सामना मुंबईत वानखेडे मैदानावर खेळविला जाईल.

या महिला क्रिकेटपटू खेळणार
भारतीय संघातील खेळाडूंबरोबरच न्यूझीलंडची सुझी बेट्‌स, सोफी डेविन, ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी, एलिसा हिली, मेगन स्कट, बेथ मूनी, इंग्लंडच्या डॅनिएल वेट, डॅनिएल हेझल या परदेशी खेळाडू खेळणार आहेत.

Web Title: Harmanpreet Kaur Smriti Mandhana captain ipl