हर्ष, आर्यनचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

पुणे - हिलसाइड जिमखाना, बिबवेवाडी आयोजित २९व्या प्रवीण करंडक राष्ट्रीय (१२ वर्षांखालील) मानांकन टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात पुण्याच्या हर्ष ठक्कर, आर्यन पापरकर या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली. 

पुणे - हिलसाइड जिमखाना, बिबवेवाडी आयोजित २९व्या प्रवीण करंडक राष्ट्रीय (१२ वर्षांखालील) मानांकन टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात पुण्याच्या हर्ष ठक्कर, आर्यन पापरकर या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली. 

बिबवेवाडीतील हिलसाइड जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात पुण्याच्या व बिगरमानांकित हर्ष ठक्करने तेलंगणाच्या व सातव्या मानांकित मोहित रेड्डी साईचा ९-३ असा पराभव केला; तर पुण्याच्या आर्यन पापरकरने मुंबईच्या आठव्या मानांकित ओमर सोमरवर चुरशीच्या लढतीत ९-५ असा विजय मिळविला. नाशिकच्या पाचव्या मानांकित जैष्णव शिंदेने पुण्याच्या अर्णव पापरकरला टायब्रेकमध्ये ९-८ (४) असे पराभूत केले.  

मुलींच्या गटात मुंबईच्या अलिना शेखने मुक्ता पाटीलचा ९-५ असा; तर पुण्याच्या कश्‍मिरा सुंबरेने आपलीच सहकारी असलेल्या भवानी खापरेला; तर रूमा गायकवारीने अपर्णा पतैटला ९-१ असे पराभूत केले.  

निकाल असे ः मुले ः हर्ष ठक्कर (पुणे) वि.वि. मोहित रेड्डी साई (तेलंगणा) ९-३; जैष्णव शिंदे (नाशिक) वि.वि. अर्णव पापरकर (पुणे) ९-८ (४); आर्यन पापरकर (पुणे) वि.वि. ओमर सोमर (मुंबई) ९-५; मानस धामणे (पुणे) वि.वि. आर्यन हूड (पुणे) ९-१; अंशूल सातव (पुणे) वि.वि. चिनार देशपांडे (पुणे) ९-१; वीर प्रसाद वि.वि. ईशान दिगंबर ९-६.  

मुली ः अलिना शेख (मुंबई) वि.वि. मुक्ता पाटील ९-५; कश्‍मिरा सुंबरे (पुणे) वि.वि. भवानी खापरे (पुणे) ९-१; रूमा गायकवारी (पुणे) वि.वि. अपर्णा पतैट (पुणे) ९-१; आदिती लाखे (पुणे) वि.वि. संचिता नगरकर (पुणे) ९-४; त्रिशा मिश्रा (मुंबई) वि.वि. स्वरा काटकर (पुणे) ९-४; अन्वेशा मुलगे (सोलापूर) वि.वि. एंजल भाटिया (पुणे) ९-४. 

Web Title: Harsh, Aryan seeded players defeat