हिनाने मिळवून दिले भारताला नेमबाजीतील तिसरे सुवर्ण

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 एप्रिल 2018

भारताचा पदकाचा दावेदार नेमबाज गगन नारंगला मात्र 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर, या प्रकारात प्रथमच उतरलेल्या चैनसिंह चौथ्या स्थानावर राहिला. भारताने आतापर्यंत 11 सुवर्ण, 4 रौप्य आणि 5 ब्राँझ पदके मिळविली आहेत. भारताची एकूण पदक संख्या 20 झाली आहे.

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांची उल्लेखनीय कामगिरी सुरुच असून, नेमबाज हिना सिद्धूने 25 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक मिळविले.

नेमबाजीत भारताने मिळविलेले हे तिसरे सुवर्णपदक आहे. हिनाने 38 गुण मिळवीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. यामध्ये दोनवेळा तिने अचूक नेम साधत पाच गुण मिळविले. ऑस्ट्रेलियाची एलेना गालियाबोविचने रौप्यपदक मिळविले. भारताला यापूर्वी मनू भाकेर आणि जितु राय यांनी सुवर्णपदके मिळवून दिली आहेत. आता हिनानेही सुवर्ण कामगिरी केली.

Image may contain: 1 person, smiling, standing

Image may contain: 3 people, people smiling, people standing

Image may contain: 1 person, smiling

Image may contain: 1 person, smiling, standing

Image may contain: 1 person, smiling, playing a sport, standing and outdoor

भारताचा पदकाचा दावेदार नेमबाज गगन नारंगला मात्र 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर, या प्रकारात प्रथमच उतरलेल्या चैनसिंह चौथ्या स्थानावर राहिला. भारताने आतापर्यंत 11 सुवर्ण, 4 रौप्य आणि 5 ब्राँझ पदके मिळविली आहेत. भारताची एकूण पदक संख्या 20 झाली आहे.

Web Title: Heena Siddhu wins gold medal in CWG