सर्वाधिक मतांसह सिंधू बॅडमिंटनपटू आयोगावर

पीटीआय
गुरुवार, 25 मे 2017

नवी दिल्ली - भारताची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिची जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या खेळाडू आयोगावर सर्वाधिक मतांनी निवड झाली. तिला १२९ मते मिळाली. जागतिक क्रमवारीत १५व्या स्थानावर असलेल्या जर्मनीच्या मार्क झ्वीब्लर याला १०८, तर स्कॉटलंडच्या कर्स्टी गिल्मूरला १०३ मते मिळाली. ही नियुक्ती चार वर्षांसाठी असेल. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सुदीरामन करंडक स्पर्धेदरम्यान मतदान झाले. १८३ जणांनी मतदान केले. सध्या या आयोगावर शिंतारो इकेदा, कोएन रीडर आणि भारताची साईना नेहवाल हे खेळाडू आहेत.
 
Web Title: With the highest votes, the Indus Badminton Competition Commission