हिमा म्हणते ''आय किल्ड दि कॉम्पिटिशन''

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जुलै 2018

ढिंग : आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या हिमाने 'फाली दिलू' (I killed the competition) असे म्हणत आपला आनंद व्यक्त केला. 20 वर्षांखालील जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत 51.46 सेकंद अशी वेळ नोंदवत हिमाने  सुवर्णपदकावर नाव कोरले. 

''देश गाढ झोपेत होता, तेव्हा मी जग गाजवत होते. मी इतिहास रचला याचा मला आनंद आहेच. मात्र, सुवर्ण पदकापेक्षा माझे लक्ष फक्त वेळेवर होते. कमी वेळ नोंदवली की आपोआप पदके मिळतात. मला अशी कामगिरी करायची होती जी दिर्घकाळ अबाधित राहिल.'' असे हिमाने म्हटले आहे.

आसाममधील ढिंग या छोट्याश्या गावातून आपला प्रवास सुरु करत हिमाने थेट सुवर्णपदक पटकावले आहे. तिच्या या कामगिरीमुळे तिच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.  

Web Title: Hima Das creates history